Pune Crime News: फुकट तिथे चिकट, पुणेकर मायलेकींनी पोलीस असल्याचं सांगून हजारो रुपयांच्या चप्पला पळवल्या!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Pune Crime News: पुण्यातील सुप्रसिद्ध एम.जी. रोडवरील एका नामांकित चप्पलेच्या दुकानात माय- लेकींनी विचित्र पराक्रम केला आहे. चप्पलेच्या दुकानामध्ये माय- लेकींनी स्वत: आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करून तब्बल हजारो रूपयांची फुकटात खरेदी केली आहे.
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध एम.जी. रोडवरील एका नामांकित चप्पलेच्या दुकानात माय- लेकींनी विचित्र पराक्रम केला आहे. चप्पलेच्या दुकानामध्ये माय- लेकींनी स्वत: आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करून तब्बल 17 हजार रूपयांची फुकटात खरेदी केली आहे. या माय- लेकी इतक्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी थेट बनावट आयडी कार्ड बनवून चप्पलेच्या दुकानातून 17 हजार रूपयांच्या चप्पलांवर डल्ला मारला आहे. डल्ला मारणाऱ्या ह्या मायलेकींना अखेर लष्कर पोलिसांनी गजाआड केलं आहे.
पुण्यातील कोंढवामध्ये त्या दोघीही राहतात. त्यांचं नाव, आई मिनाज मुर्तजा शेख (वय 40) आणि तिची मुलगी रिबा मुर्तजा शेख (वय 19) असं आहे. अशी आरोपी मायलेकींची नावे आहेत. मिनाज आणि रिबा यांच्या विरोधात यापूर्वी कोंढवा पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. 13 सप्टेंबरच्या सायंकाळी घडलेल्या ह्या घटनेमध्ये मिनाज आणि रिबा या मायलेकी पुण्याच्या एम.जी. रोडवरील एका प्रसिद्ध चप्पलेच्या दुकानामध्ये गेल्या. यावेळी मिनाजने ती आयपीएस ऑफिसर असल्याची बतावणी करून तिचं आयडी कार्ड दाखवून तिने दुकानामध्ये आपले वर्चस्व तयार केले.
advertisement
मिनाज- रिबाने त्यांच्या घरात लग्नाचा कार्यक्रम असल्याचं सांगत तब्बल 17,000 ची चप्पल आणि बुट खरेदी केली. दोघींनीही संपूर्ण खरेदी केल्यानंतर दुकानातील एका कामगाराला 'पैसे घेण्यासाठी कमिश्नर ऑफिसला चल' असं म्हणाली. पैसे न देता या दोघींनीही तिकडून पळ काढला. आयपीएस ऑफिसर असल्याची बतावणी करून फुकटात खरेदी केलेल्या ह्या चोरट्या महिलेची सध्या पुण्यामध्ये कमालीची चर्चा सुरू आहे. घडलेल्या घटनेनंतर दुकानदाराने तात्काळ लष्कर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली.
advertisement
फुटेजमध्ये आरोपी मायलेकींच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत आहेत. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सूत्रांच्या मदतीने दोघींना शोधून काढलं आहे. 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी लष्कर पोलिसांनी दोघींना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 45 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापूर्वीही या दोघींनी अशा प्रकारच्या फसवणूक केल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले आहे. आरोपी मिनाज आणि रिबा यांच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात याआधी तीन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या दोघी शहरातील वेगवेगळ्या भागातील दुकानदारांना लक्ष्य करत असतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी दुकानदारांना केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लष्कर पोलिस करत असून, आरोपींनी आणखी कुठे अशा प्रकारे फसवणूक केली आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 06, 2025 4:49 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime News: फुकट तिथे चिकट, पुणेकर मायलेकींनी पोलीस असल्याचं सांगून हजारो रुपयांच्या चप्पला पळवल्या!