Bihar Assembly Election 2025 Live: बिहारमध्ये 2 टप्प्यात मतदान, निकाल 14 नोव्हेंबर रोजी; Surveyने सांगितले कोणाला मिळणार किती जागा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Bihar Assembly Election 2025 Schedule: संपूर्ण देशभरात चर्चेत राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीची अखेर आज घोषणा करण्यात आली. निवडणुकीचे वेळापत्रक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केले.
नवी दिल्ली/पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज सोमवारी करण्यात आली आहे. याच बरोबर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राजकीय पक्षांनी छठ पर्वानंतर एकाच टप्प्यात संपूर्ण बिहारमध्ये निवडणुका घेण्याची मागणी केली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त मतदार मतदान करू शकतील.
advertisement
राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार असून पहिला टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
विधानसभेच्या एकूण जागा: 243 (203- खुला, 38- एससी, 2- एसटी)
advertisement
विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर रोजी संपणार
एकूण मतदार: 7.42 कोटी
पुरुष: 3.92 कोटी
महिला: 3.50 कोटी
14.1 लाख मतदार प्रथमच मतदान करणार
बिहार निवडणूक कार्यक्रम
पहिला टप्पा: 06 नोव्हेंबर 2025
advertisement
दुसरा टप्पा: 11 नोव्हेंबर 2025
निवडणुकीचे निकाल 14 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर होतील.
बिहारमध्ये कोण बाजी मारणार? या संदर्भात ‘वोट वाइब‘ (Vote Vibe) या संस्थेने सर्वेक्षण केले होते. ज्यातून अनेक धक्कादायक आकडेवारी समोर आली होती.
advertisement
नीतीश सरकारविरोधी लाट?
सर्वेक्षणामधील एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की– मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारबद्दल लोकांचे मत काय आहे? सत्ताविरोधी (anti-incumbency) भावना आहे की सरकारच्या बाजूने (pro-incumbency) कल आहे?
advertisement
आकडे आश्चर्यकारक
48% लोकांनी स्पष्टपणे सांगितले की, बिहारमध्ये एक मजबूत सत्ताविरोधी लाट आहे.
27.1% लोकांनी सरकारचे समर्थन केले.
20.6% लोकांनी आपली भूमिका तटस्थ (neutral) ठेवली.
advertisement
4.3% लोकांनी ‘माहित नाही’ असे उत्तर दिले.
शहरी आणि ग्रामीण भागांतील कल
शहरी भागातील:
48% लोकांनी सरकारविरोधी भूमिका घेतली.
31% लोकांनी सरकारला पाठिंबा दिला.
17% लोक तटस्थ होते.
ग्रामीण भागातील:
48% लोकांनी सरकारविरोधी भूमिका घेतली.
25% लोकांनी सरकारला पाठिंबा दिला.
22% लोक तटस्थ होते.
या आकडेवारीनुसार शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये सरकारविरोधी भावना सारखीच आहे. जी जवळपास 48% इतकी आहे.
सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, पुरुष आणि महिलांमध्येही सरकारविरोधी भावना समान आहे.
48% पुरुष आणि 48% महिलांनी सत्ताविरोधी लाट असल्याचे सांगितले.
20% पुरुष आणि 22% महिला तटस्थ होत्या.
29% पुरुष आणि 25% महिलांनी सरकारला पाठिंबा दिला.
नीतीश फॅक्टर कमकुवत होतोय का?
हे सर्वेक्षण राहुल गांधींच्या ‘व्होटर अधिकार यात्रे’नंतर झाले असले तरी या यात्रेचा RJD किंवा काँग्रेसला थेट फायदा होईल असे स्पष्टपणे दिसून येत नाही. मात्र या आकडेवारीवरून हे नक्कीच स्पष्ट होते की बिहारमध्ये सत्ताविरोधी लाट आहे.
आता बिहारमध्ये निवडणुका कधी आणि किती टप्प्यांमध्ये होणार हे निर्णय निवडणूक आयोग घेईल. पण तुम्हाला माहिती आहे का की बिहार विधानसभा निवडणुका 2020 मध्ये किती टप्प्यांमध्ये झाल्या होत्या, निकाल कधी लागला होता आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या?
अशी झाली होती 2020ची विधानसभा निवडणूक
बिहारमधील मागील विधानसभा निवडणुका 2020 साली कोरोनाच्या दरम्यान घेण्यात आल्या होत्या. त्या वेळी निवडणुका तीन टप्प्यांत झाल्या:
पहिला टप्पा: 28 ऑक्टोबर 2020
दुसरा टप्पा: 3 नोव्हेंबर 2020
तिसरा टप्पा: 7 नोव्हेंबर 2020
निवडणुकीचे निकाल 10 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आले होते.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
2020 च्या निवडणुकीत एनडीएने (NDA) विजय मिळवत सरकार स्थापन केले. एनडीएला एकूण 125 जागा, तर महागठबंधनाला 110 जागा मिळाल्या. यामध्ये राजद (RJD) ही 75 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरली.
एनडीए आघाडीतील पक्ष आणि जागा
भाजप- 74
जनता दल (युनायटेड)- 43
विकासशील इंसान पार्टी (VIP)- 04
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM)-04
महाआघाडीतील पक्ष आणि जागा
राष्ट्रीय जनता दल (RJD)- 75
काँग्रेस-19
सीपीआय (एमएल)- 12
AIMIM व इतर - 05
2020 च्या बिहार निवडणुकीत एनडीए आणि महाआघाडी यांच्यातील फरक फक्त 12 हजार मतांचा होता. दोघांनाही जवळजवळ सारखाच मतांचा टक्का मिळाला —
एनडीए: 37.26%
महागठबंधन: 37.23%
म्हणजेच महाआघाडीला केवळ 12,000 मतांच्या फरकामुळे 15 जागांवर पराभव पत्करावा लागला.
बिहारच्या राजकारणात नवीन समीकरण
बिहारमध्ये आगामी निवडणुकीतही मुख्य लढत एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात होणार आहे. पण या वेळी एक नवीन घटक मैदानात उतरला आहे तो म्हणजे प्रशांत किशोर यांची जन सुराज पार्टी. याचा निकालावर किती आणि कसा परिणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 4:38 PM IST
मराठी बातम्या/देश/
Bihar Assembly Election 2025 Live: बिहारमध्ये 2 टप्प्यात मतदान, निकाल 14 नोव्हेंबर रोजी; Surveyने सांगितले कोणाला मिळणार किती जागा