Dombivli : रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागायची, त्याने घरात नेलं आणि...डोकं चक्रावुन टाकणारी मर्डर स्टोरी

Last Updated:

एक व्यक्ती भिकारी तरूणीला थेट घरात घेऊन गेला. तरूणीला देखील तो व्यक्ती भला माणूस वाटला आणि ती त्याच्यावर विश्वास ठेवून घरी गेले.पण तिला कुठे माहितं होतं ती ज्या घरात जात आहे,त्या घरात तिचा मृत्यू लिहला आहे.

Dombivli crime
Dombivli crime
Dombivali Crime : रस्त्यावर सहला आपल्याला एखादा भिकारी दिसला तर आपण त्याच्या हातात एक तर पैसे देतो किंवा त्याला काहीतरी खाण्यासाठी देऊ करतो. मात्र या घटनेत एक व्यक्ती भिकारी तरूणीला थेट घरात घेऊन गेला. तरूणीला देखील तो व्यक्ती भला माणूस वाटला आणि ती त्याच्यावर विश्वास ठेवून घरी गेले.पण तिला कुठे माहितं होतं ती ज्या घरात जात आहे,त्या घरात तिचा मृत्यू लिहला आहे.आता तुम्हाला देखील वाटलं असेल नेमकं या भिकारी तरूणीसोबत त्या व्यक्तीने घरात काय केलं असेल? तर जाणून घेऊयात संपूर्ण घटनाक्रम.
advertisement
मिळालेल्या माहितीनूसार श्रीनिवास विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीला एक दिवशी रेल्वेने प्रवास करताना एक भिकारी तरूणी दिसली.या भिकाऱ्या तरूणीला पाहून त्याने पैसे देण्याऐवजी माझ्या घरी राहायला येशील का?अशी विनंती केली.त्यामुळे अंगावर फाटके कपडे, दोन वेळच्या जेवणाच्या पंचाईत,डोक्यावर छप्पर नाही हे पाहता भिकारी तरूणीने आपल्याला घरी राहायला मिळतेय हे पाहून तिने लगेच होकार दिला आणि श्रीनिवास तिला घरी घेऊन आला.
advertisement
मात्र घरी आल्यावर त्याने तिला सगळ्या सुविधा दिल्या पण त्याचसोबत तिचा गैरफायदा देखील घेतला. श्रीनिवास विश्वकर्माच्या घरी ती तब्बल पाच वर्ष राहिली.या पाच वर्षा दरम्यान कुणी जर त्या तरूणीबद्दल विचारल तर त्यांना कधी बहीण, कधी मुलगी तर कधी बायको म्हणून तिची ओळख सांगायचा.तसेच श्रीनिवास तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करायचा. या अत्याचारामुळे ती 4 महिन्यांची गर्भवती राहिली होती. या अवस्थेतही श्रीनिवास तिला सोडायचा आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार करायचा.
advertisement
सतत या अत्याचाराला तरूणी कंटाळून गेली होती.त्यामुळे तिने शु्क्रवारी असाच श्रीनिवास अत्याचार करत असताना थेट शरीरसंबधासाठी नकार दिला होता.त्यामुळे श्रीनिवास विश्वकर्मा प्रचंड संतापला आणि त्याने तिची हत्या करून टाकली.या हत्येनंतर श्रीनिवासने गुन्हा लपवण्यासाठी घरातीलच बॅगेत तरुणीचा मृतदेह कोंबून ठेवला होता.त्यानंतर श्रीनिवासने रविवारी रात्री बॅग जाऊन देसाई खाडीत फेकून दिली.त्यानंतर श्रीनिवास फरार झाला होता.
advertisement
यानंतर खाडीत फेकलेली बॅग स्थानिकांना सापडली आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. यानंतर शिळ डायघर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा तपास सूरू केला होता.एक सुटकेस आणि मृत महिलेच्या हत्येचा तसा छडा लावून खूपच अवघड होतं. पण वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पोळ आणि पीआय राजपूत यांच्या टीमने सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आरोपीची ओळख पटवून श्रीनिवास विश्वकर्मा याला उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून अटक कली. शिळ डायघर पोलिसांनी 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. या घटनेनंतर आरोपी विश्वकर्मा याने या घटनेची कबुली दिली आहे.या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dombivli : रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागायची, त्याने घरात नेलं आणि...डोकं चक्रावुन टाकणारी मर्डर स्टोरी
Next Article
advertisement
Dombivli : डोंबिवलीत पलावा सिटीसमोर सुटकेसमध्ये आढळला होता तरुणीचा मृतदेह, 24 तासांत आरोपी सापडला, कृत ऐकून अंगावर येईल शहारे
डोंबिवलीत सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह प्रकरणाात आरोपी पकडला, भयानक कारण समोर
  • डोंबिवलीत सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह प्रकरणाात आरोपी पकडला, भयानक कारण समोर

  • डोंबिवलीत सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह प्रकरणाात आरोपी पकडला, भयानक कारण समोर

  • डोंबिवलीत सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह प्रकरणाात आरोपी पकडला, भयानक कारण समोर

View All
advertisement