करोडो बुडाले, बहिणीची हत्या झाली! टीव्हीची लोकप्रिय सून झाली कंगाल; आता अभिनेत्री हिमालयात मागतेय भिक्षा!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Actress Life Ruined: टीव्हीवर तब्बल २७ वर्षे सूनेची आणि बहिणीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीचे आयुष्य एका क्षणात पूर्णपणे बदलले आहे.
मुंबई: टीव्हीवर तब्बल २७ वर्षे सूनेची आणि बहिणीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीचे आयुष्य एका क्षणात पूर्णपणे बदलले आहे. ही कहाणी आहे, आयुष्यात आलेल्या एकापाठोपाठ एक अशा भीषण आघातांमुळे कंटाळलेल्या आणि सर्व ऐशोआराम सोडून साध्वी बनलेल्या अभिनेत्री नूपुर अलंकार यांची.
advertisement
advertisement
१९९० च्या दशकात 'शक्तिमान'मधून करिअरची सुरुवात केलेल्या नूपुर अलंकार यांनी 'घर की लक्ष्मी बेटियां'सह १५७ हून अधिक टीव्ही शोज आणि 'सांवरिया' सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. २००२ मध्ये त्यांनी को-ॲक्टर अलंकार श्रीवास्तव यांच्याशी लग्न केले. त्यांचे आयुष्य एका सुंदर स्वप्नासारखे सुरू होते, पण २०१९ मध्ये आलेल्या एका संकटाने सर्व काही बदलून टाकले.
advertisement
२०१९ मध्ये पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याची बातमी आली. नूपुर यांची आयुष्याची जवळपास एक कोटी रुपयांची रक्कम याच बँकेत होती. RBI ने खाते फ्रीज केल्यामुळे त्या पूर्णपणे कंगाल झाल्या. त्यांना दागिने विकावे लागले, मित्रांकडून ५०,००० रुपयांचे कर्ज घ्यावे लागले आणि एका सहकलाकाराकडून तर प्रवासासाठी ५०० रुपये घ्यावे लागले होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


