रोहित पवारांवर 'ट्रम्प' कार्डचं उलटलं, बनावट आधार प्रकरणात गुन्हा दाखल
- Published by:Kranti Kanetkar
- Reported by:PRASHANT BAG
Last Updated:
रोहित पवार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून धनंजय वागस्कर यांनी तक्रार केली आहे.
मुंबई, प्रतिनिधी प्रशांत बाग: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार एका गोष्टीमुळे अडचणीत येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड तयार केल्या प्रकरणी रोहित पवार अडचणीत येणार आहेत. बोगस आधार कार्ड प्रकरणी रोहित पवार अडचणीत येणार आहेत. रोहित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
रोहित पवारांनी बनावट आधारकार्ड कसं तयार केलं जातं याचं प्रात्यक्षिक करुन दाखवलं होतं. त्यानुसार बनावट आधार कार्ड तयार करुन कशा पद्धतीनं पुरावे उभे केले जातात आणि मिटवलेही जातात हे सांगितलं होतं. हे प्रकरण त्यांना अडचणीत आणणार आहेत. डोनाल्ड ट्रम्पयांचं बोगस आधार कार्ड बनवणं भोवणार आहे. धनंजय वागस्करांच्या तक्रारीनंतर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
आदरणीय फडणवीस साहेब,
बोगस मतदार नोंदण्यासाठी बनावट आधार कार्ड कसं तयार केलं जातं याचा पत्रकार परिषदेत मी डेमो दाखवला. याची गृहविभागाने चौकशी केली आणि आधारकार्ड बनावट असल्याचं निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करणार असल्याचं समजलं....
आता यावर हसावं की रडावं हेच कळेना...
जर मीच… https://t.co/ZNNhPLxmgd
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 28, 2025
advertisement
रोहित पवार काय म्हणाले होते?
बोगस मतदार नोंदण्यासाठी बनावट आधार कार्ड कसं तयार केलं जातं याचा पत्रकार परिषदेत मी डेमो दाखवला. याची गृहविभागाने चौकशी केली आणि आधारकार्ड बनावट असल्याचं निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करणार असल्याचं समजलं.... आता यावर हसावं की रडावं हेच कळेना... जर मीच स्वतः डेमो देऊन आधारकार्ड बनावट असल्याचं सांगत असेल तर आधारकार्ड खरं की बनावट याची १५ दिवस चौकशी करण्याची मुळातच गरज काय होती? एवढा रिकामा वेळ गृह विभागाकडे कसा आहे? असेलच तर डॉ. संपदा मुंडे, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, संतोष देशमुख, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रकरण यासह अशा कितीतरी घटना आहेत ज्यामधील SIT चौकशी किंवा पोलीस तपास पुढे सरकत नाही. अशा प्रकरणात गृह विभागाने चौकशी करण्यासाठी आपला वेळ खर्च करावा. आपण अभ्यासू नेते आहात आणि त्याचा कायमच आदर आहे, पण आज आपल्या सल्लागारांना समज देण्याची आणि गृहविभागाने रिकामटेकडेपणा सोडून कामावर लक्ष देण्याच्या सूचना देण्याची गरज आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2025 10:15 AM IST


