advertisement

Dr. Jaysingrao Pawar Passed Away : शिवचरित्राचा 'अथांग' अभ्यासक हरपला! ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार यांचे निधन

Last Updated:

Dr. Jaysingrao Pawar Passed Away : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

शिवचरित्राचा 'अथांग' अभ्यासक हरपला! ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार यांचे निधन
शिवचरित्राचा 'अथांग' अभ्यासक हरपला! ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार यांचे निधन
कोल्हापूर: महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. जयसिंग पवार यांच्या निधनाने मराठा साम्राज्याच्या इतिहासाचं एक विद्यापीठ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक आणि इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना आहे. डॉ. पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. (सर्वप्रथम) आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम केले. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या संशोधन कारकिर्दीची मुहूर्तमेढ १९६४ मध्ये शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रोवली गेली. विद्यापीठाच्या इतिहास विभागात दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रांच्या अभ्यासातून त्यांनी संशोधनाचा समृद्ध अनुभव गाठीशी बांधला. आपल्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी 'महारानी ताराबाई', 'सेनापती संताजी घोरपडे', 'मराठेशाहीचा मागोवा' आणि 'राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ' यांसारख्या २५ हून अधिक मौलिक ग्रंथांची निर्मिती केली.
advertisement

इतिहास संशोधनातील दीपस्तंभ

डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवछत्रपती आणि मराठा इतिहासाच्या शुद्ध लेखनासाठी अर्पण केले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराबाई आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर त्यांनी केलेले संशोधन मैलाचा दगड मानले जाते. 'मराठी रियासत' आणि विशेषतः 'महारानी ताराबाई' यांच्या कर्तृत्वावर त्यांनी प्रकाश टाकून इतिहासातील अनेक दुर्लक्षित पैलू समाजासमोर आणले. आपल्या संशोधनाच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी केवळ कागदपत्रे तपासली नाहीत, तर इतिहासातील विस्मृतीत गेलेल्या महापुरुषांना आणि विशेषतः 'स्त्री-शक्तीला' पुन्हा एकदा जनमानसात जिवंत केले.
advertisement
डॉ. पवारांचा पिंड हा पूर्णतः संशोधकाचा होता. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील 'राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र' उभे करण्यात आणि त्याचा नावलौकिक वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी इतिहासाकडे कधीही भावनिक दृष्टिकोनातून पाहिले नाही, तर पुराव्यांच्या आधारावर सत्य मांडण्याचे धाडस दाखवले. मराठा साम्राज्याच्या जडणघडणीत स्त्रियांचे योगदान किती मोठे होते, हे सिद्ध केले. महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई यांच्यावर त्यांनी केलेले संशोधन आजही सर्वोच्च मानले जाते. डॉ. पवार हे नवीन पिढीतील संशोधकांसाठी चालता-बोलता विद्यापीठ होते. त्यांच्या जाण्याने कोल्हापूरच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
advertisement

>> जयसिंगराव पवार यांची प्रकाशित पुस्तके

> महाराणी ताराबाई
> क्रांतिसिंह नाना पाटील
> सेनापती संताजी घोरपडे
> संभाजी स्मारक ग्रंथ
> मराठेशाहीचा मागोवा
> मराठी साम्राज्याचा उदयास्त
> शिवचरित्र- एक मागोवा
> शिवचरित्रापासून काय शिकावे?
> आमच्या इतिहासाचा शोध व बोध
> राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ (३ खंड)
> मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध
advertisement
> मराठेशाहीचे अंतरंग
> शिवपुत्र छत्रपती राजाराम
> छत्रपती संभाजी- एक चिकित्सा
> राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व कार्य
> राजर्षी शाहू छत्रपती: एक मागोवा
> राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे व हुकूमनामे
> राजर्षी शाहू छत्रपती, कर्मवीर भाऊराव पाटील व प्रबोधनकार ठाकरे
> राजर्षी शाहू छत्रपतींची भाषणे
> राजर्षी शाहू छत्रपती पत्रव्यवहार आणि कायदे
advertisement
> मराठ्यांचा इतिहास खंड १ : शिवशाही
> मराठ्यांचा इतिहास खंड २ : पेशवाई
> मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई : खंड १ व २
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dr. Jaysingrao Pawar Passed Away : शिवचरित्राचा 'अथांग' अभ्यासक हरपला! ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार यांचे निधन
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement