Success Story: मेहनतीला चवदार यश! घरातूनच उभा केला केळी चिप्सचा व्यवसाय; पैठणच्या छाया बांदल यांची महिन्याला लाखभर कमाई
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
पैठण येथील छाया बांदल या गेल्या दोन वर्षांपासून केळी चिप्स बनवण्याचं काम करत आहे. याबरोबरच त्यांचे पती बाबासाहेब बांदल 2010 पासून रसवंती गृह चालवतात.
छत्रपती संभाजीनगर: पैठण येथील छाया बांदल या गेल्या दोन वर्षांपासून केळी चिप्स बनवण्याचं काम करत आहे. याबरोबरच त्यांचे पती बाबासाहेब बांदल 2010 पासून रसवंती गृह चालवतात. त्यामुळे ग्राहक चांगले ओळखीचे झाले, ओळख निर्माण झाल्यामुळे केळी चिप्स व्यवसायाला सुद्धा चांगले प्रोत्साहन मिळाले. केळी चिप्स विक्रीच्या माध्यमातून दररोज 3 ते 4 हजार रुपयांची उलाढाल होते तर महिन्याकाठी 1 लाख रुपयांच्या जवळपास उलाढाल होते. याबरोबरच केळी चिप्सचा व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
केळी चिप्स बनवणे आणि चिप्स विक्रीच्या व्यवसाया अगोदर या व्यवसायात दुसरीकडे कामगार म्हणून काम करत होतो. सुरुवातीपासून व्यवसायात असल्यामुळे अनुभवानुसार माहिती मिळत राहिली. 2023 पासून केळी चिप्स बनवायला सुरुवात केली. केळी चिप्स बनवण्यासाठी कच्ची केळी अगोदर व्यापाऱ्याकडून किंवा शेतकऱ्याकडून खरेदी केली जाते. त्यानंतर त्या केळीवर विविध प्रकारची प्रक्रिया करून चिप्स तयार केले जातात आणि तेव्हाच त्या चिप्सची ग्राहकांना विक्री होत असल्याचे छाया बांदल यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
महिलांनी केळी चिप्स बनवणे व्यवसाय कसा सुरू करावा?
स्वतःच्या मेहनतीवर हा व्यवसाय असल्यामुळे आम्ही हा व्यवसाय करत आहोत, सर्व कामे घरीच आहे मी स्वतः करतो. नवीन व्यवसाय सुरू करायचा झाल्यास साधारणतः किमान सहा महिने तरी नफ्याचा विचार करायचा नाही. सहा ते सात महिने घरूनच पूर्ण खर्च करायचा त्यानंतर ग्राहक वाढत जातात प्रतिसाद चांगला मिळायला लागतो तेव्हा स्वतः आपण पैसे कमवतो आणि नफा देखील मिळायला सुरुवात होते, असे देखील बांदल यांनी म्हटले आहे.
advertisement
केळी चिप्स कसे बनवायचे?
view commentsकच्ची केळी आणल्यानंतर एक - एक केळी कट करायची, त्या केळीला शिलून घ्यायचे, पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे. त्यानंतर गरम तेलाच्या कढईमध्ये वेफर्स तयार करायचे. वेफर्स तळणं झाल्यानंतर तेज करायचे असल्यास मसाला लावायचा, मिडीयम ठेवायचे असेल तर काही प्रमाणात मीठ वापरायचे अशा पद्धतीने केळी चिप्स तयार करता येतात.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 9:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Success Story: मेहनतीला चवदार यश! घरातूनच उभा केला केळी चिप्सचा व्यवसाय; पैठणच्या छाया बांदल यांची महिन्याला लाखभर कमाई










