advertisement

VIDEO : वाहतुक कोंडीच्या बैठकीला निघाले अन् कोंडीत सापडले, आमदारावर पायी प्रवास करायची वेळी

Last Updated:

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे बैठकीला जात होते.मात्र त्यांना वाहतुक कोंडीचा फटका बसला होता.त्यामुळे त्यांना पायीच बैठकीच्या ठिकाणी पोहोचावे लागले आहे.

bhiwandi mla shantaram more face traffic issue
bhiwandi mla shantaram more face traffic issue
Bhiwandi MLA Shantaram More Face Traffic Issue : नरेश पाटील, भिवंडी :मुंबईसह उपनगरात सध्या वाहतुक कोडींचा प्रश्न खूपच गंभीर बनला आहे.या वाहतुक कोंडीमुळे नागरीकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. कारण तासनतास त्यांना वाहतुक कोंडीत अडकून रहावं लागतं आहे. वाहतूक कोंडीची हीच समस्या सोडविण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे बैठकीला जात होते.मात्र त्यांना वाहतुक कोंडीचा फटका बसला होता.त्यामुळे त्यांना पायीच बैठकीच्या ठिकाणी पोहोचावे लागले आहे.
सध्या संपूर्ण मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. त्यातल्या त्यात एरवी मुंबईसह उपनगरात प्रचंड वाहतुक कोंडी असते. त्यात सणासुदीलाही अशीच वाहतुक कोंडी राहिली तर गणेशभक्तांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे. हा मनस्ताप टाळण्यासाठी भिवंडीतील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी आज वाहतुक कोंडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे आपल्या गाडीतून निघाले होते. मात्र काही अंतरावर पोहोचताच त्यांच्यावर वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ आली होती.
advertisement
भिवंडीतील हॉलिमेरी स्कूलमध्ये वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत वाहतूक पोलिसांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी आमदार शांताराम मोरे आपल्या गाडीतून निघाले होते. पण त्यांना देखील वाहतूक कोंडीचा फटका बसला.त्यामुळे या वाहतूक कोंडीमुळे आमदार शांताराम मोरे यांच्यावर पायी बैठकीला पोहोचण्याची वेळ आली. या दरम्यान नागरीकांनी आमदाराचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
advertisement
दरम्यान दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना विध्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. 2 ते 3 किलोमीटरचा प्रवासांसाठी तासंतास प्रवास करावा लागत होता.त्यामुळे नागरीक मेटाकुटीला आले आहेत. आता गणेशोत्सवात देखील रस्त्यावर भीषण परिस्थिती असणार आहे.त्यामुळे जर वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला नाही तर बाप्पांच्या आगमना दरम्यान आणि विसर्जना दरम्यान गणेश भक्तांना प्रचंड त्रास होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : वाहतुक कोंडीच्या बैठकीला निघाले अन् कोंडीत सापडले, आमदारावर पायी प्रवास करायची वेळी
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement