तहानेनं व्याकूळ हत्ती पोहोचला गावात, पाणी मिळालं नाही म्हणून काय केलं पाहा VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पाणी मिळालं नाही म्हणून हत्तीनं फोडल्या गाड्या, पाहा VIDEO
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर : वातावरणात अनेक बदल होत आहेत. त्याचा त्रास आपल्याला होतो तर प्राण्यांना किती होत असेल, काही ठिकाणी पाणीटंचाईचे प्रश्न सुरू झाले आहेत. अशातच एक हत्ती भटकत भटकत गावात पोहोचला. पाण्याच्या शोधात पोहोचला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. त्याला गावात पिंप दिसलं त्याने सोंड लावून ते पाहिलं मात्र रिकामं होतं.
हत्ती तहानेनं व्याकूळ असावा बहुतेक अशी कुजबुज गावकऱ्यांमध्ये सुरू झाली. गावकऱ्यांना वाटलं हत्ती मागे फिरून पुन्हा जंगलात जाईल पण कसलं काय हत्ती तर गावात शिरला. त्याने पिंप टाकून दिलं आणि तो गावात घुसला. त्याने रस्त्यात आलेल्या बाईकचं मोठं नुकसान केलं.
पाण्याच्या शोधात गावात आला हत्ती पुढे जे घडलं ते भयंकर
पाहा VIDEO #Elephant pic.twitter.com/SpomR3rBo1— News18Lokmat (@News18lokmat) March 1, 2024
advertisement
हत्तीनं बाईकची इतकी वाईट अवस्था केली की बस्स. आपल्या सोंडेनं आणि पायाने बाईकची सीट काढून टाकली. पुढचा भाग गाडीपासून वेगळा करण्याचा प्रयत्न केला. गाडीची मोडतोड करुन झाल्यावर हत्ती पुन्हा रस्त्याने चालू लागला.
तहानेनं व्याकूळ हत्ती पोहोचला गावात, पाणी मिळालं नाही म्हणून काय केलं पाहा VIDEO
(2)#Elephant pic.twitter.com/z0siEcbM3C— News18Lokmat (@News18lokmat) March 1, 2024
advertisement
बेळगाव जवळच्या बीके कंग्राळी या गावांमध्ये आज सकाळी जंगली हत्ती आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हत्ती घुसल्याची माहिती ग्रामस्थांनी तातडीनं पोलीस आणि वनविभागाला दिली.
वन विभागाने हा हत्ती शहरात जाऊ नये, इथूनच जंगलात परतावा यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. साधारण दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर हत्तीला जंगलाच्या दिशेनं पाठवण्यात यश आलं आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे गावकऱ्यांमध्ये हत्तीबद्दल चांगलीच धास्ती बसली आहे. हत्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 01, 2024 12:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तहानेनं व्याकूळ हत्ती पोहोचला गावात, पाणी मिळालं नाही म्हणून काय केलं पाहा VIDEO