गरबा खेळत होती महिला, अचानक मृत्यूने गाठलं, वसईत फाल्गुनीसाठी गरबा नाईट ठरली जीवघेणी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Vasai: नवरात्रीच्या (Navaratri) मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. वसई पश्चिमेकडील ओम नगर परिसरात गरबा खेळत असताना एका ४६ वर्षीय महिलेचा अचानक मृत्यू झाला.
वसई: नवरात्रीच्या (Navaratri) मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. वसई पश्चिमेकडील ओम नगर परिसरात गरबा खेळत असताना एका ४६ वर्षीय महिलेचा अचानक मृत्यू झाला. संबंधित महिला गरबा खेळत असताना तिला अस्वस्थ वाटू लागलं आणि त्या खाली कोसळल्या. यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ओम नगर येथील विघ्नेश्वर मंडळात घडली.
फाल्गुनी राजेश शहा (४६) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या ओम नगरच्याच रहिवासी होत्या. नवरात्रोत्सव सुरू असल्याने त्या दररोजप्रमाणे उत्साहाने गरबा खेळण्यासाठी मंडळात गेल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, गरबा खेळत असताना अचानक फाल्गुनी शहा यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना चक्कर येऊन त्या जागीच कोसळल्या.
हा प्रकार पाहताच गरबा आयोजक आणि उपस्थित लोकांनी तातडीने त्यांना जवळच्या योग्यम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांची गंभीर स्थिती लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. परंतु, उपचारांदरम्यानच फाल्गुनी शहा यांची प्राणज्योत मालवली.
advertisement
प्राथमिक अंदाजानुसार, अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण ओम नगर परिसरात आणि वसईतील नवरात्रोत्सव मंडळांमध्ये शोककळा पसरली आहे. उत्साहाच्या वातावरणात झालेल्या या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची नोंद माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Location :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
September 27, 2025 7:25 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गरबा खेळत होती महिला, अचानक मृत्यूने गाठलं, वसईत फाल्गुनीसाठी गरबा नाईट ठरली जीवघेणी