'दुकानात येऊ नका', मारकडवाडीत आमदार जानकरांच्या समर्थकांवर बहुजन कुटुंबाचा गंभीर आरोप
- Published by:Sachin S
Last Updated:
मारकडवाडी गावामध्ये एका समाजावर उत्तमराव जानकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला असल्याचा आरोप होत आहे.
विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी
पंढरपूर: फुले ,शाहू ,आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर चालणाऱ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार उत्तम जानकर यांनी मारकडवाडी या गावांमध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये मोठा आवाज केला होता. पण ईव्हीएम कशा पद्धतीने खोटे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानिमित्ताने संपूर्ण देशाचे लक्ष मारकडवाडी गावाकडे लागले होते. त्याच मारकडवाडी गावामध्ये एका समाजावर उत्तमराव जानकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला असल्याचा आरोप होत आहे. आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांनी दलित कुटुंबाला किराणा माल देण्यास नकार दिल्याचं व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
नुकत्याच घडलेल्या तक्रारीमध्ये उत्तमराव जानकर यांच्या समर्थकांच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला होता, हा गुन्हा दाखल केल्याचा राग मनामध्ये धरून सार्वजनिक असलेल्या किराणा दुकानांमध्ये संबंधित फिर्यादीला आणि मातंग समाजाला किराणा माल देण्यास नकार देऊन त्यांच्यावर बहिष्कार टाकला असल्याचा प्रकार मारकडवाडी गावामध्ये घडला आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय असून हा प्रकार घडवण्यासाठी विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या समर्थकांनी अट्टाहास केला आहे, असा थेट आरोप संबंधित कुटुंबाकडून केल्याने महाराष्ट्रात मारकडवाडी गाव पुन्हा एकदा चर्चेला आले आहे.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या मतदारसंघात असा प्रकार त्यांच्या समर्थकांकडून घडणे ही त्यांच्या पक्षाच्या विचार धारेचा खूनच केला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणावर शरद पवार उत्तम जानकर यांना खडेबोल सुनावणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसंच मारकवाडीतील किराणा दुकानदार अनधिकृतपणे गुटखा,गोवा,मावा तसेच पेट्रोल विक्री करत आहेत. या दुकानदारावरती प्रशासनाने धडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
July 19, 2025 5:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'दुकानात येऊ नका', मारकडवाडीत आमदार जानकरांच्या समर्थकांवर बहुजन कुटुंबाचा गंभीर आरोप