65 वर्षीय शेतकऱ्यांचा शेतात काम करताना करूण अंत, दृश्य पाहून गावकरी हादरले, अहिल्यानगरमधील घटना

Last Updated:

बाळानाथ रोहम हे नेहमी प्रमाणे आज शेतात कामाला गेले होते. शेतीत मशागतीचं काम सुरू होतं. दुपारच्या वेळी

News18
News18
अहिल्यानगर : राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच अहिल्यानगरमधून एक मन विचलित करणारी बातमी समोर आली आहे. शेतीची मशागत करत असताना ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील  कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गावात ही घटना घडली आहे. बाळनाथ पुंजाबा रोहम (वय ६५) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. बाळानाथ रोहम हे नेहमी प्रमाणे आज शेतात कामाला गेले होते. शेतीत मशागतीचं काम सुरू होतं. दुपारच्या वेळी बाळानाथ रोहम यांनी शेतात ट्रॅक्टरला रोटारोव्हरच्या मदतीने मशागतीचं काम सुरू होतं. काही वेळ काम केल्यानंतर रोटाव्हेटरमध्ये काही तरी कचरा अडकला होता.
advertisement
रोटाव्हेटरमध्ये कचरा अडकल्यामुळे पुढे जात येत नव्हतं. त्यामुळे बाळानाथ रोहम खाली उतरले आणि त्यांनी पाहिलं की रोटाव्हेटरमध्ये काही तरी कचरा अडकला आहे. कचरा हाताने लगेच बाजूला करता येईल. असं गृहीत धरून बाळानाथ यांनी हाताने रोटाव्हेटरमधला कचरा काढण्याचा प्रयत्न केला, पण, अचानक त्यांचा हात रोटाव्हेटरमध्ये अडकला.  रोटाव्हेटरमध्ये हात अडकल्यामुळे बाळानाख आत ओढले गेले. काही कळायच्या आता त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
advertisement
बाळानाथ यांच्यासोबत घडलेली घटना शेजारी शेतात काम करणाऱ्या मजुरांनी पाहिली. तातडीने सगळे जण मदतीला धावून आले. गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी बाळानाथ यांच्या शेताकडे धाव घेतली. त्यांना तातडीने रोटाव्हेटरमधून बाहेर काढण्यात आलं. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या प्रकरणी अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाळानाथ  रोहम यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
65 वर्षीय शेतकऱ्यांचा शेतात काम करताना करूण अंत, दृश्य पाहून गावकरी हादरले, अहिल्यानगरमधील घटना
Next Article
advertisement
Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement