Panvel Crime : पनवेलचा नराधम बाप, पोटच्या पोरीवरच अत्याचार केले, 100 रुपये दिले अन्...
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
बापानेच मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे, याप्रकरणी नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.
प्रमोद पाटील, प्रतिनिधी
पनवेल : बापानेच मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे, याप्रकरणी नराधम बापाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे.
1 फेब्रुवारीला रात्री 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत आरोपी बापानेच शरीरसंबध प्रस्थापित करत तिच्यावर अत्याचार केला, तसंच तिला 100 रुपये देऊन हा प्रकार कुठे सांगू नको, असं सांगितलं, त्यावेळी रात्री सगळे झोपलेले होते.
advertisement
सकाळी उठल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला, मात्र बाप असल्याने याबाबत कुठेही वाच्यता करण्यात आली नाही, त्यानंतर 4 फेब्रुवारीला पीडित मुलीला घेऊन तिची आई पनवेल शहर पोलीस स्टेशनला पोहोतली आणि त्यानंतर आरोपी विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका झांजुरणे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
advertisement
मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार
दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील तामसा येथे मुख्याध्यापकाने शाळेतील 10वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. विद्यार्थिनीच्या गर्भपातानंतर ही घटना उघड झाली आहे. मुख्याध्यापक राजू सिंग चौहाण याने त्याच शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केले. मागच्या ऑगस्ट महिन्यात मुख्याध्यापकाने पीडित मुलीला नांदेडला नेऊन तिच्यावर अत्याचार केले आणि नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार सुरू ठेवले, यातून मुलगी गरोदर राहिली, त्यामुळे मुख्याध्यापकानेच मुलीचा गर्भपात केला.
advertisement
मुलीच्या कुटुंबाला हा प्रकार कळल्यानंतर याबाबत तामसा पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला, त्यानंतर मुख्याध्यापक फरार झाला आहे.
Location :
Panvel,Raigad,Maharashtra
First Published :
February 12, 2025 10:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Panvel Crime : पनवेलचा नराधम बाप, पोटच्या पोरीवरच अत्याचार केले, 100 रुपये दिले अन्...