Dombivli Local: सकाळची गर्दी अन् डोंबिवलीकर महिलेचा मोबाईल अडकला सीटच्या गॅपमध्ये, आता 24 तास लागणार काढायला!

Last Updated:

Dombivli Local: आरपीएफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी मोबाईल काढण्यासाठी प्रयत्न केले.

Dombivli Local: सकाळची गर्दी अन् डोंबिवलीकर महिलेचा मोबाईल अडकला सीटच्या गॅपमध्ये, आता 24 तास लागणार काढायला!
Dombivli Local: सकाळची गर्दी अन् डोंबिवलीकर महिलेचा मोबाईल अडकला सीटच्या गॅपमध्ये, आता 24 तास लागणार काढायला!
डोंबिवली: महानगरी मुंबईमध्ये जाण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांसाठी लोकल ट्रेन हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. दररोज सकाळी याठिकाणांहून हजारो चाकरमनी लोकलच्या माध्यमातून मुंबईत जातात. मात्र, सकाळी लोकलमध्ये असलेली गर्दी कधीकधी मनस्ताप देणारी देखील ठरते. डोंबिवलीतील एका महिलेसोबत असंच काहीसं घडलं आहे. गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये धक्का लागून महिलेचा मोबाईल फोन सिटच्या गॅपमध्ये अडकल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज (30 सप्टेंबर) सकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी सुटलेल्या डोंबिवली ते सीएसएमटी स्लो लोकलमध्ये एका महिला प्रवाशाचा मोबाईल फोन सिटच्या गॅपमध्ये अडकला. खूप वेळ प्रयत्न करून फोन काढता आला नाही. त्यानंतर आरपीएफ अधिकाऱ्यांना मदतीसाठी कॉल करण्यात आला. ही लोकल सीएसएमटीला पोहोचताच महिलेच्या मदतीसाठी स्टाफ पाठवण्यात आला.
advertisement
स्टाफने प्रयत्न करूनही मोबाईल बाहेर काढता आला नाही. यानंतर, ती लोकल पुन्हा डोंबिवलीच्या दिशेने मार्गस्थ झाली. डोंबिवलीत आल्यानंतर आरपीएफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा मोबाईल काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आलं नाही. अखेर याबाबत डोंबिवली स्टेशन मास्तरकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित लोकल ट्रेन रात्री कारशेडमध्ये गेल्यानंतर सिटच्या गॅपमधील वेल्डिंग काढून मोबाईल बाहेर काढण्याचं आश्वासन संबधित महिलेला देण्यात आलं आहे.
advertisement
सकाळी किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळी लोकलमध्ये उभं राहण्यासाठी देखील जागा नसते. अशा वेळी अनेकदा मोबाईलसारख्या किमती गोष्टी खाली पडण्याच्या किंवा हरवण्याच्या घटना घडतात. धावत्या लोकलमधूनही मोबाईल खाली पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dombivli Local: सकाळची गर्दी अन् डोंबिवलीकर महिलेचा मोबाईल अडकला सीटच्या गॅपमध्ये, आता 24 तास लागणार काढायला!
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement