advertisement

मुंबई गोवा महामार्गावर उड्डाणपूल कोसळला, राष्ट्रवादीचा आमदार थोडक्यात बचावला, VIDEO

Last Updated:

चिपळूण इथं गेल्या काही दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर पुलाचे काम सुरू आहे. आज सकाळी काम सुरू असताना काही भागाला अचानक तडे गेले होते.

(चिपळूण येथील घटना)
(चिपळूण येथील घटना)
स्वप्निल घाग, प्रतिनिधी
चिपळूण, 16 ऑक्टोबर : मुंबई गोवा महामार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. चिपळूण इथं एक नाका येथील उड्डाणपूल कोसळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम अपघातातून थोडक्यात बचावले आहे.
चिपळूण इथं गेल्या काही दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर पुलाचे काम सुरू आहे. आज सकाळी काम सुरू असताना काही भागाला अचानक तडे गेले होते. मात्र दुपारी दोनच्या दरम्यान उर्वरित पुलाचा भाग संपूर्ण कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
advertisement
मात्र, या दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम अपघातातून थोडक्यात बचावले. त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी झाली आहे.
advertisement
दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील मोरवंडे सुतारवाडी या ठिकाणी अपघात झाला आहे. खेडहून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी स्वराला पाठीमागून जोरदार धडक देऊन ट्रक चालकाने पलायन केलं. अपघातानंतर महामार्गावरील इतर वाहन चालकांनी गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वाराला रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवले. यासंदर्भात खेड पोलिसांना देखील कळवण्यात आलं आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबई गोवा महामार्गावर उड्डाणपूल कोसळला, राष्ट्रवादीचा आमदार थोडक्यात बचावला, VIDEO
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement