Construction Workers: बांधकाम कामगारांना मिळू शकतात लाखो रुपयांचे लाभ, कुठे आणि कशी करायची नोंदणी?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Construction Workers: राज्यातील बांधकाम कामगारांसाठी 32 प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत.
पुणे: सध्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू आहेत. यामध्ये रहिवासी इमारती आणि बिझनेस सेंटर्सचा समावेश आहे. ही बांधकामं पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असते. सध्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लाखो बांधकाम मजूर काम करतात. कामाच्या ठिकाणी अनेकदा अपघात देखील घडतात. अशा परिस्थितीत या मजुरांना मोफत उपचार मिळावेत यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्य करत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील बांधकाम कामगारांसाठी 32 प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. नोंदणीकृत कामगार, त्यांचे कुटुंबीय आणि 18 वर्षांखालील दोन मुलांना दोन लाखांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार, तपासणी आणि शस्त्रक्रिया असे लाभ मिळत आहेत.
advertisement
कुठे आणि कशी करायची नोंदणी?
नाव नोंदणीसाठी कामगारांना मासिक एक रुपया शुल्क भरावं लागते. नोंदणीसाठी आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, रहिवासी दाखला, मागील 90 दिवसांमध्ये केलेल्या कामाचं प्रमाणपत्र गरजेचं आहे. नोंदणीचं नुतनीकरण देखील करता येतं.
पुण्याचे कामगार उपायुक्त निखिल वाळके म्हणाले, "बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जात आहे. जिल्ह्यात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ज्या कामगारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीनुसार ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी."
advertisement
या योजनांमुळे कामगारांचं जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होत आहे. या योजनेतंर्गत नोंदणीकृत कामगारांना गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळतात. तसेच, त्यांच्या कुटुंबाला आणि 18 वर्षाखालील दोन मुलांनाही याचा लाभ घेता येतो. त्यामुळे उपचारांदरम्यान त्यांना मोठ्या खर्चाचा भार सहन करावा लागत नाही
बांधकाम कामगारांचा 10 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर 50 टक्क्यांच्या मर्यादेत दरवर्षी 6 हजार, 15 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर 75 टक्के मर्यादेत वर्षाला 9 हजार, तर 20 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर वर्षाला 12 हजार निवृत्तिवेतन देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 26, 2025 10:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Construction Workers: बांधकाम कामगारांना मिळू शकतात लाखो रुपयांचे लाभ, कुठे आणि कशी करायची नोंदणी?