advertisement

30 प्रवाशांनी भरलेल्या बसचा अपघात, खिडकीतून वाचवला जीव, गडचिरोलीत रात्री उशिरा थरार

Last Updated:

गडचिरोली सिरोंचा तालुक्यात 30 प्रवाशांनी भरलेली एसटी बस कंबालपेटा नाल्यावर उलटली, चालक पळाला, प्रवाशांनी खिडकीतून बाहेर उड्या मारून जीव वाचवला, प्रशासनावर संताप.

News18
News18
महेश तिवारी, प्रतिनिधी गडचिरोली: ३० प्रवाशांनी भरलेली बस एका मोठ्या नाल्याच्या वळणावर उलटली आणि अर्ध्यावरच लटकली. सुदैवाने, प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून ही बस ६ फूट खोल पाण्यात कोसळली नाही, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. या घटनेनंतर बस चालकाने प्रवाशांना वाऱ्यावर सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ही धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात घडली. 30 प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात होता होता टळला.
नेमकं काय घडलं?
सिरोंचावरून रेगुंटाकडे जाणारी एसटी बस रात्रीच्या सुमारास कंबालपेटा नाला ते टेकडा दरम्यान आली होती. या ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्याने एक कच्चा वळण मार्ग तयार करण्यात आला आहे. रात्रीच्या अंधारात वळण घेताना चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट नाल्याच्या कडेला गेली. बस एका बाजूला पूर्णपणे झुकली आणि नाल्यात पडता पडता तिथेच अडकून राहिली.
advertisement
खिडकीतून काढला मार्ग!
बस पाण्यात कोसळणार असे वाटताच प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. बस एका बाजूला लटकलेली असताना प्रवाशांनी अत्यंत सावधगिरीने बसच्या खिडकीतून बाहेर उड्या मारल्या आणि स्वतःचा जीव वाचवला. हा नाल्यात ६ फुटांपर्यंत पाणी असून जर बस पूर्णपणे उलटली असती, तर मदतीसाठी कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी झाली असती.
चालकाचा बेजबाबदारपणा
धक्कादायक बाब म्हणजे, अपघात होताच प्रवाशांना मदत करण्याऐवजी चालकाने स्वतः बसमधून उडी मारून तिथून पळ काढला. प्रवाशांनी स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडून एकमेकांना वाचवले. रात्रीच्या वेळी हा सर्व थरार सुरू असताना परिसरात कोणाचेही साहाय्य मिळणे कठीण होते.
advertisement
प्रशासनाविरुद्ध संताप
पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने आणि कच्चा रस्ता नीट नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रवाशांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या त्या चालकावर आणि रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
30 प्रवाशांनी भरलेल्या बसचा अपघात, खिडकीतून वाचवला जीव, गडचिरोलीत रात्री उशिरा थरार
Next Article
advertisement
Grampanchayat Election: गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' तारखांवर ठेवा लक्ष
गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' त
  • राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे.

  • गावगाड्याचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.

  • येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

View All
advertisement