Gadchiroli News : लोकसभा निवडणुकीपूर्वी गडचिरोलीत मोठा घातपात टळला! पोलिसांची मोठी कारवाई
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Gadchiroli News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरलीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
गडचिरोली, (मनोज तिवारी, प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोलामार्कच्या जंगलात आज चार माओवादी ठार करण्यात जवानांना यश आलं आहे. तेलंगणातून घातपात घडवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात घुसखोरी केलेल्या माओवाद्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रणनीती आखली होती. रात्रीच्या अंधारात रात्रभर पोलिसांनी घनदाट जंगलात माओवाद्यांच्या विरोधात कोंबिंग ऑपरेशन राबवले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज दिली आहे.
माओवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून चार माओवादी ठार झाले असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मिळालेला मोठा यश असल्याचा दावा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केला आहे. पोलिसांनी नीलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी आजच्या चकमकी संदर्भातली पत्रकार परिषद. घेतली असून या पत्रकार परिषदेला माओवाद विरोधी अभियानाचे आईजी संदीप पाटील, डीआयजी अंकित गोयल उपस्थित होते.
advertisement
वाचा - अभिजित बांगर, अश्विनी भिडेंसह या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या! कुणाची वर्णी कुठे?
डोक्यावर 40 लाख बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याचा मृत्यू
चार दिवसापूर्वी 40 लाख रुपये बक्षीस असलेला जहाल माओवाद्यांच्या माड विभागाचा विभागीय सचिव कोपा उर्फ मनोजचा करुण अंत झाला आहे. माओवादी सचिव कोपा उर्फ मनोजचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला आहे. सचिव हा गेली 40 वर्ष माओवादी चळवळीत सहभागी होता. कोपावर अनेक मोठ्या घटनेत सहभागी झाल्याचे 93 गंभीर गुन्हे दाखल असून गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगडच्या भागात संघटनेत कोपाने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोपा उर्फ मनोज उसेंडी (वय 72 वर्ष) याचा दीर्घ आजाराने एटापल्ली तालुक्यातील एक दुर्गम गावातील जंगल परिसरात मृत्यू झाला. सहकारी माओवाद्यांनी त्याचा मृतदेह आज नातेवाईकांकडे पाठवला आहे.
Location :
Gadchiroli,Maharashtra
First Published :
Mar 19, 2024 11:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
Gadchiroli News : लोकसभा निवडणुकीपूर्वी गडचिरोलीत मोठा घातपात टळला! पोलिसांची मोठी कारवाई










