IAS Transfer : अभिजित बांगर, अश्विनी भिडेंसह या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या! कुणाची वर्णी कुठे?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
IAS Transfer : महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. यामध्ये ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अनेर दिग्गज अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने फटकारल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर लगेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. यात ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचादेखील यामध्ये समावेश आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्तपदी आता ठाणे मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांची बदली करण्यात आली आहे. मुंबई मनपावर पुन्हा एकदा ठाण्यातील मनपा आयुक्तांची वर्णी लागली आहे.
तसेच जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अंकित, बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विशाल नरवाडे आणि धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकीरी शुभम गुप्ता, आएएस अधिकारी संजय मीना, अमित सैनी यांची तडकाफडकी बदली केल्याची माहिती समोर आली आहे
advertisement
कोणाची बदली कुठे?
- अमित सैनि, अभियान संचालक, जलजीवन मिशन यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर.
- संजय मीना यांची नियुक्ती महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती आयुक्त, सहकार व निबंधक, सहकारी संस्था पुणे या पदावर.
- विशाल नरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे या पदावर.
- अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे मनपा यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर.
- अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा या पदावर.
- कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर.
- अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक , मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन या पदावर.
- संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर.
- शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर.
- पृथ्वीराज बी.पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा या पदावर.
- डॉ. कुमार खेमनार अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा यांची नियुक्ती आयुक्त, साखर, पुणे या पदावर.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2024 9:54 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
IAS Transfer : अभिजित बांगर, अश्विनी भिडेंसह या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या! कुणाची वर्णी कुठे?










