काकांची उघड साथ, पुण्याचा बालेकिल्ला मिळविण्यासाठी अजितदादा कामाला लागले, भाजपला ZP निवडणुकीत आस्मान दाखवणार?

Last Updated:

Pune ZP Election: महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड या बालेकिल्ल्यात पराभव झाल्यानंतर झेप घेण्यासाठी अजितदादा पुन्हा कामाला लागले.

अजित पवार-मुरलीधर मोहोळ-चंद्रकांत पाटील
अजित पवार-मुरलीधर मोहोळ-चंद्रकांत पाटील
वैभव सोनवणे, प्रतिनिधी, पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून सपाटून पराभव झालेल्या अजित पवारांना पुन्हा राजकीय प्रतिष्ठा टिकवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पर्याय समोर आहे. त्यामुळेच तातडीने कामाला लागत जिल्हा परिषद निवडणुकीच्या नियोजनाला सुरूवात केलीय. त्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एकाच चिन्हावर लढवण्यासाठीच्या खलबतांनी जोर धरलाय.
महापालिका निवडणुकीत दोन चिन्हावर निवडणूक लढल्याचा फटका जिल्हा परिषद निवडणुकीत टाळण्यासाठी अजित पवारांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच्या बैठकाही सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढतील हे जवळपास नक्की झालंय. पक्षात फूट पडतेवेळी १४ जिल्हा परिषद सदस्यांनी शरद पवार यांची साथ दिली होती. लोकसभेला त्याचा मोठा परिणाम दिसला. त्यामुळे ही फूट टाळून एकाच चिन्हावर निवडणूक लढविण्याचे नियोजन दोन्ही राष्ट्रवादीकडून सुरू आहे. ग्रामीण भागात पवार यांना मानणाऱ्या मतदारांचा वरचष्मा राहिलाय, त्याचचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय.
advertisement

अजित पवार विरुद्ध भाजप अशीच पुणे जिल्ह्यात लढत

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकसंध राष्ट्रवादीचा अनेक ठिकाणी प्रभाव होता. मागील अनेक वर्षांपासून अजित पवार यांनीच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळल्याने निधी देवघेवीच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचे संघटन मजबूत केले. ग्रामीण भागातील अनेक तरुणांना त्यांनी सक्रिय राजकारणात आणले. परंतु राज्यात सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने ठरवून पुणे जिल्ह्यातील अजित पवार यांच्या वर्चस्वाला दणके द्यायला सुरुवात केली आहे. आत्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीत जोरदार संघर्ष रंगणार आहे.
advertisement

पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण जागा (७५ जागा)

राष्ट्रवादी-४४
शिवसेना-१३
काँग्रेस-०७
भाजप-०७
इतर-०४
पुणे जिल्हा परिषदेत सध्या सत्ता संतुलनाची स्थिती दिसून येते. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचा पारंपरिक प्रभाव अजूनही अनेक भागांत जाणवतो, तर दुसरीकडे भाजपने गेल्या काही वर्षांत संघटन मजबूत करत आपली पकड वाढवली आहे. ग्रामीण भागातील विकासकामे, निधीवाटप आणि प्रशासकीय निर्णयांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
अजित पवारांची राजकीय प्रतिष्ठा आणि जिल्ह्यात असलेले वर्चस्व या जिल्हा परिषद निवडणुकीत कायम राहते की बदलते, हे पाहावे लागेल. ही निवडणुक राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची ठरते का हे देखील महत्त्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काकांची उघड साथ, पुण्याचा बालेकिल्ला मिळविण्यासाठी अजितदादा कामाला लागले, भाजपला ZP निवडणुकीत आस्मान दाखवणार?
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement