चकमकीत ठार झालेल्या 'त्या' माओवाद्यांची ओळख पटली; मृतांमध्ये 16 लाखांचं बक्षीस असलेल्या वास्तुचाही समावेश
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले होते. त्यांची ओळख पटली आहे.
गडचिरोली, महेश तिवारी, प्रतिनिधी : गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले होते. यात दोन महिला आणि एका पुरुष माओवाद्याचा समावेश होता. दरम्यान आता त्या माओवाद्यांची ओळख पटली आहे. त्यात पेरमेली दलमचा कमांडर असलेला जहाल माओवादी वास्तुचाही समावेश आहे. त्याच्यावर खून दरोडा पोलिसांवर हल्ले करणे असे सात गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्यावर 16 लाख रुपयांचं बक्षीस सरकारने ठेवलं होतं.
तर मृत दोन महिला माओवाद्यांपैकी रेश्मा मडकामवर खून दरोडा चकमक असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर चार लाख रुपयांच बक्षीस ठेवण्यात आलं होतं. तर पेरमिली दलमची तिसरी सदस्य असलेल्या कमला मडावीवर देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिला पकडण्यासाठी दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.
दरम्यान सोमवारी गडचिरोली पोलिसांनी चकमकीत ठार केलेले हे तीनही माओवादी माओवाद्यांच्या पेरमिली दलमचे सदस्य आहेत. गेली 40 वर्षे दक्षिण भागात खून दरोडे जाळपोळ पोलीस दलावर हल्ले असे गंभीर गुन्हे करून या माओवाद्यांनी पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. मात्र आता या तिघांच्या मृत्यूनंतर पेरमिली दलमध्ये एकही माओवादी नसल्याने पेरमिली दलम संपुष्टात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
advertisement
1991 मध्ये या पेरमिली दलमने केलेल्या हल्ल्यात तब्बल दहा राज्य राखीव दलाच्या जवानांचा मृत्यू झाला होता. पेरमिली दलम संपुष्टात आल्याने गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या हिंसक कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश येणार आहे, असं येथील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Gadchiroli,Gadchiroli,Maharashtra
First Published :
May 14, 2024 8:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
चकमकीत ठार झालेल्या 'त्या' माओवाद्यांची ओळख पटली; मृतांमध्ये 16 लाखांचं बक्षीस असलेल्या वास्तुचाही समावेश


