advertisement

Gadchiroli News : नेटवर सर्च करून सासरच्यांचा सुनेने काढला काटा; प्रेमविवाहाला वर्षही झालं नव्हतं, पतीलाही मारलं

Last Updated:

संघमित्रा ही रोशन कुंभारे याची पत्नी आहे. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन तिने डिसेंबर २०२२ मध्ये रोशनसोबत लग्न केलं.

गडचिरोली जिल्ह्यातील विषारी हत्याकांड
गडचिरोली जिल्ह्यातील विषारी हत्याकांड
गडचिरोली, 19 ऑक्टोबर : गडचिरोलीत अहेरी तालुक्यातील महागावमध्ये १५ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे गूढ उकलले असून सुनेनेच त्यांची हत्या केल्याचं समोर आलं. ज्याच्याशी प्रेमविवाह केला त्याचा, त्याच्या आई वडिलांचा, बहिणीचा आणि मावशीचा खून करण्यात आला. याप्रकरणी संघमित्रा कुंभारे आणि रोझा रामटेके यांना अटक करण्यात आलीय. त्यांनी या प्रकरणी धक्कादायक अशी माहिती पोलिसांना दिली.
संघमित्रा ही रोशन कुंभारे याची पत्नी आहे. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन तिने डिसेंबर २०२२ मध्ये रोशनसोबत लग्न केलं. त्यानंतर संघमित्राच्या वडिलांनी आत्महत्या केली. तर विवाहानंतर पतीसह सासरच्यांकडून संघमित्राचा छळ केला जात होता. यामुळेच तिने काटा काढायचं ठरवलं. तर दुसरी आरोपी रोझा रामटेके ही संघमित्राची मामेसासू आहे. रोशनची आई विजया कुंभारे आणि तिच्या इतर बहिणी या रोझाच्या वडिलांच्या संपत्तीत वाटणी मागत होत्या. त्यावरून नेहमी वाद होत असतं. यातूनच संघमित्रा आणि रोझा यांनी मिळून पाच जणांना मारण्याचा कट रचला.
advertisement
संघमित्रा आणि रोझा यांनी सुरुवातीला धोतरा या विषारी वनस्पतीचा वापर करून विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. मात्र धोतऱ्याचा वापर केल्यास अन्न आणि पाण्याचा रंग बदलत असल्याचं त्यांना समजलं. यानंतर दोघींनी इंटरनेटची मदत घेत विषाबद्दल माहिती मिळवली. त्यांनी रंग, चव न बदलणारे विष शोधले. तसंच हे विष शरिरात गेल्यानंतर चार ते पाच दिवसांनी याचा परिणाम होतो असंही त्यांना समजलं.
advertisement
रोझाने तेलंगणा राज्यातून विष आणले. जेव्हा संधी मिळेल तेव्हा जेवणात हे विष मिसळले. संघमित्राचे सासू सासरे सुरुवातीला आजारी पडले. दोघेही २६ आणि २७ सप्टेंबर रोजी मृत्यूमुखी पडले. तर संघमित्राची नणंद कोमल दहागावकरचा ८ ऑक्टोबरला मृत्यू झाला. मावशी आनंदा उंदीरवाडे यांचा १४ ऑक्टोबरला आणि संघमित्राचा पती रोशन कुंभारेचा १५ ऑक्टोबरला मृत्यू झाला. सध्या आणखी तिघांवर उपचार सुरू आहेत. यात रोशनच्या आई वडिलांना दवाखान्यात नेणारा वाहनचालक राकेश मडावी, रोशनचा मावसभाऊ बंटी आणि रोशनचा भाऊ राहुल यांच्यावर उपचार सुरू आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
Gadchiroli News : नेटवर सर्च करून सासरच्यांचा सुनेने काढला काटा; प्रेमविवाहाला वर्षही झालं नव्हतं, पतीलाही मारलं
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement