...तर त्याला बाप दाखवल्याशिवाय राहणार नाही, गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा
- Reported by:AJIT MANDHARE
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
वनमंत्री गणेश नाईक हे अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री कंजुले यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले.
अजित मांढरे, प्रतिनिधी, पालघर : पालघर जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ नगरपालिकेत भाजपची येणार असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. कुणी प्रेमाने सांगितले तर प्रवासात सोबत घेऊ मात्र कुणी बाप होण्याचा प्रयत्न केला तर त्याला बाप दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता दिला. तसेच कल्याण डोंबिवली आणि ठाण्यातही साफसफाई होईल, असेही गणेश नाईक म्हटल्याने भाजप सेनेमधला संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.
वनमंत्री गणेश नाईक हे अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री कंजुले यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी भाजप उमेदवारांची बैठकही घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. आमचा बाप बनण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असा इशारा त्यांनी दिला.
तर बाप दाखवल्याशिवाय राहणार नाही, गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना इशारा
advertisement
पालघर जिल्ह्यातील चारही नगरपालिका तसेच बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेत भाजपची सत्ता येईल. इतरही महत्त्वाच्या नगरपालिकांत भाजपचं कमळ फुलेल. याचा अर्थ सगळीकडेच भाजप असेल. आम्हाला प्रेमाने समजून सांगितले तर आम्ही तुम्हाला प्रवासामध्ये बरोबर घेऊ. अगदी आमची अडचण झाली तरी तुम्हाला सोबत घेऊ. पण कोणी बाप होण्याचा प्रयत्न केला तर त्याचा बाप दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
advertisement
एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात संघर्ष
ठाणे जिल्ह्यातून एकमेव आमदार गणेश नाईक यांनाच भाजपने मंत्रिपदावर संधी दिल्यानंतर आता त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या ठाण्यात भाजपचा गड अधिक बळकट करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात पक्षाच्या वाढीसाठी सातत्याने जनता दरबार घ्यावेत, अशा सूचना गणेश नाईक यांना भाजप नेतृत्वाकडून मिळाल्याचे सांगण्यात येते. गणेश नाईक यांचे ठाण्यातील जनता दरबार हे एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्यासाठीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही महिन्यात जनता दरबाराच्या माध्यमातून नाईक यांनी शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आता निवडणुकीच्या रणांगणात देखील शिंदे यांना खिंडीत गाठण्यासाठी नाईक प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Nov 28, 2025 6:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...तर त्याला बाप दाखवल्याशिवाय राहणार नाही, गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा







