advertisement

Gondia : माजी नगरसेवकावर गोळीबार प्रकरणी चौघे अटकेत, मास्टरमाइंड फरार; हल्ल्याचं कारण आलं समोर

Last Updated:

दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी माउझर बंदूकीने लोकेश यादव यांच्यावर मागून गोळी झाडली.

News18
News18
रवी सपाटे, गोंदिया : गोंदिया येथील माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर 11 जानेवारी रोजी अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. यात लोकेश यादव हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले होते. लोकेश यादव यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांना लागलेली गोळी बाहेर काढली. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान, या  प्रकरणी चार आरोपींना 48 तासात पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर याप्रकरणातील दोन मुख्य आरोपींचा फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत अशी माहिती पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव हे यादव चौकातीलच तलाव काठावरील मंदिरातून पूजापाठ करून घरी येत होते. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी माउझर बंदूकीने यादव यांच्यावर मागून गोळी झाडली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थित आहे.
याप्रकरणी पोलिस प्रशासनाने वेगवेगळी पथक तयार करुन आरोपींच्या शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी लोकेश यादव याच्यावर गोळी चालविणारे आरोपी गणेश शिवकुमार शर्मा (21, रा.भिंडी ले आऊट नागपूर), अक्षय मधुकर मानकर (29) कळमेश्‍वर) यांना नागपूर येथून ताब्यात घेतले. तसेच गंगाझरी जंगलातून धनराज उर्फ रिंकू राजेंद्र राऊत (32 रा.कुंभारेनगर) व गोंदिया येथून नागसेन बोधी मंतो (41, रा.श्रीनगर) यांना ताब्यात घेतले.
advertisement
चौकशीदरम्यान त्यांनी आर्थिक देवाणघेवाणीतून लोकेश यादव यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची कबुलीही दिली. तसेच प्रशांत मेश्राम (गौतमबुद्ध नगर) व रोहीत मेश्राम (कळमेश्‍वर) यांच्या सांगण्यावरुन लोकेश यादव याच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. न्यायालयाने अटकेतील आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. याप्रकरणात आणखी आरोपी असल्याची शक्यता वर्तविली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Gondia : माजी नगरसेवकावर गोळीबार प्रकरणी चौघे अटकेत, मास्टरमाइंड फरार; हल्ल्याचं कारण आलं समोर
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement