गोंदिया शहरात माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार, गंभीर जखमी
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
लोकेश यादव यांच्यावर गोंदिया शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या यादव चौक या ठिकाणी गोळीबार झाला.
रवी सपाटे, गोंदिया : गोंदियात माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारात लोकेश यादव हे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने नागपूरला हलवण्यात आलं आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर गोंदिया शहरात खळबळ उडाली असून भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोकेश यादव यांच्यावर गोंदिया शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या यादव चौक या ठिकाणी गोळीबार झाला. लोकेश यादव यांच्या पाठीवर गोळीबार करण्यात आला. यात ते जखमी झाले असून उपचारासाठी शासकीय महाविद्यालयात दाखल केलं होतं. मात्र गंभीर जखमी असल्याने नागपूरला हलवण्यात आले. गोळीबाराच्या घटनेनंतर शहरात दहशतीचे वातावरण आहे. त्यांच्या समर्थकांनी रुग्णालय आवारात मोठी गर्दी केली आहे.
advertisement
लोकेश यादव यांच्यावर तीन अज्ञातांनी हेमू कॉनलीजवळ गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला. त्यांच्या कंबरेला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. लोकेश यादव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांचे भाऊ आहेत. त्यांच्यावर गोळीबाराच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2024 12:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
गोंदिया शहरात माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार, गंभीर जखमी










