Gondia Student : नागपूर विद्यापीठाचा अफलातून निर्णय! गोंदियात परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची 20 किमी पायपीट

Last Updated:

Gondia Student : नागपूर विद्यापीठाच्या एका निर्णयाचा फटका सालेकसा तालुक्यातील विद्यार्थ्यांना बसला आहे. परीक्षा केंद्र बदलल्याने मुलांना 15 ते 20 किलोमीटर पायपीट करावी लागतेय.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
गोंदिया, (रवी सपाटे, प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील आदिवासी बाहुल भागातील जी. के. कला व विज्ञान महिला महाविद्यालय कावराबांध येथील विद्यार्थिनींना प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्यामुळे पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करून परीक्षेसाठी सालेकसा येथे जावे लागत आहे. एक किलोमीटर अंतरावरील झालीया येथील नियमित परीक्षा केंद्र ऐन परीक्षेच्या तोंडावर बदलण्याचा अफलातून निर्णय विद्यापीठाने घेतला. या निर्णयावर व विद्यापीठाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत विद्यार्थिनींनी रोष व्यक्त केला आहे. विद्यापीठाने हा निर्णय मागे घेऊन पूर्वस्थिती कायम करावी किंवा 850 विद्यार्थिनींची संख्या असलेला जी. के. कला व विज्ञान महाविद्यालयालाच नवीन परीक्षा केंद्र जाहीर करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
आमगाव, सालेकसा तालुका हे आदिवासी नक्षलग्रस्त भागातील तालुके असून आमगाव सालेकसा मार्गावरील कावराबांध येथे अनुदानित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित जी. के. कला व विज्ञान महिला महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी भागातील मुले, मुली सायकल किंवा पायी या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येतात. यापूर्वी या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचे परीक्षा केंद्र एक किलोमीटर अंतरावरील झालीया येथील विना अनुदानित महाविद्यालयात होते. हे परीक्षा केंद्र फक्त एक किलोमीटर अंतरावर असल्यामुळे भर उन्हातही परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी व वेळेत पोहोचण्यासाठी सोयीस्कर होते.
advertisement
नुकतीच 15 मे पासून पदवीची परीक्षा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना किंवा कावराबांध येथील महाविद्यालयाला कुठली पूर्वसूचना न देता परीक्षा केंद्र परीक्षेच्या दोन दिवसापूर्वी मिळालेल्या हॉल तिकीटद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र एम बी पटेल महाविद्यालयात असल्याचे कळले. विद्यापीठाच्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांना धक्काच बसला. काही विद्यार्थ्यांच्या घरापासून हे परीक्षा केंद्र 25 ते 30 किलोमीटर लांब आहे. या मार्गावर वेळेवर बसची सोय नाही. या नक्षल प्रभावित भागातून सायंकाळी परत येण्यासाठी बसची संख्या फारच कमी असल्यामुळे पालकांना मुली घरी परत येण्यापर्यंत काळजी असते. महाविद्यालयाने सुद्धा विद्यार्थ्यांची हित लक्षात घेता नागपूर विद्यापीठ परीक्षा विभागाला पत्राद्वारे परीक्षा केंद्र बदलून मिळण्यासाठी विनंती केली. परंतु, विद्यापीठाने या समस्याकडे लक्ष दिले नाही.
advertisement
वाचा - गडचिरोलीत अशोक नेते हॅटट्रिक मारणार की काँग्रेसचा नवा डाव चालणार? काय सांगते आकडेवारी?
विद्यापीठाचा हा निर्णय फारच अफलातून वाटत असून हे विद्यापीठाने हेतू पुरस्कर केले असावे अशी शंका व्यक्त होत आहे. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे काही विद्यार्थिनी परीक्षेपासून वंचित राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यापीठाने हा निर्णय रद्द करून ते पूर्ववत करावे किंवा जीके महाविद्यालयात नवीन परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Gondia Student : नागपूर विद्यापीठाचा अफलातून निर्णय! गोंदियात परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची 20 किमी पायपीट
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement