Crime For Alcohol: दारूसाठी 200 रूपये न दिल्याने तळीरामाची सटकली, केलं असं काही...घटना CCTVत कैद
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
गोंदिया शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दारूसाठी 200 रूपये न दिल्याने तळीरामाने दुकानाची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
गोंदिया:
दारूसाठी तळीराम कसं आकाश पाताळ एक करतात, हे आपण वारंवार पाहिलं आहे. आता गोंदिया शहरात दारूसाठी सुरू असणारी गुंडगिरी समोर आली आहे. दारूसाठी 200 रूपये दिले नाही म्हणून एका तळीरामाने दुकानाची तोडफोड केल्याची बाब समोर आली आहे. हातात चाकू व काठ्या घेऊन या तरूणाने तोडफोड केली आहे.घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. यामुळे गोंदिया शहरात गुंडगिरी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
शहरात वाढती गुंडगिरी:
गोंदिया शहरात दिवसेंदिवस खून, हत्या, धारदार शस्त्रांनी हल्ला होण्याची घटना ही नित्याचीच बाब झाली आहे. दिवस उजाडला कि सकाळी नवनवीन अश्या अपराधीक घटनांची बातमी कानावर येत असते आणि अपराध करणा- यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचीच प्रचिती यावरून दिसून येत आहे. असेच एक नशे करिता एका दुकानादाराला 200 रुपये मागणा-या तरूणाला पैसे न दिल्यास त्याने आपल्या मित्राच्या सहाय्याने त्या दुकानादाराच्या दुकानात तोडफोड केली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे व इतर साहित्यांची तोडफोड केल्याचे सीसीटीव्हीतून दिसून येत आहे.
advertisement
तर दुकानदार दुकानात नसल्याने असता त्याच्या शास्त्रीवॉर्डातील घरी शस्त्र घेवून जात त्याच्या कुटुंबीयांना धमकाविले. ही घटना देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी फिर्यादी प्रतिक मुन्ना मेश्राम यांनी आपल्या सोबत घडलेल्या घटनांची माहिती रामनगर पोलिस ठाण्यात नोंदविली.
लगाम बसणार कधी?
view commentsसदर गुंड प्रवृत्तीच्या अपराधीला लवकरात लवकर अटक करून मला व माझ्या कुटुंबाला त्याच्या दहशतीतून मुक्त करावे, अशी मागणी दुकानदाराने केली आहे. सदर अपराधीने दुकानात शिरत लोखंडी रॉडच्या सहाय्याने दुकानात तोडफोड केली असं फिर्यादीने सांगितलं आहे. आरोपी शिवम मनोहर वैदय वय 31 वर्ष रा. गढ्ढाटोली गोंदिया यांच्या विरूद्ध योग्य कारवाई व्हावी, या आशयाची तोंडी तक्रार रामनगर पोलिसांत नोंदविली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 20, 2024 4:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Crime For Alcohol: दारूसाठी 200 रूपये न दिल्याने तळीरामाची सटकली, केलं असं काही...घटना CCTVत कैद


