Mahadev Munde Case: महादेव मुंडेंच्या मानेचा तुकडा पिशवीत टाकून तो वाल्मिक कराडकडे गेला होता, मन सुन्न करणारा खुलासा

Last Updated:

'वाल्मिक कराडच्या सांगण्यावर गोट्या गितेनं हत्या केली होती. महादेव मुंडेंची हत्या केल्यानंतर एका पिशवीमध्ये महादेव मुंडे यांच्या मानेजवळील मासाचा तुकडा घेऊन फिरत होता'

News18
News18
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी
बीड : "महादेव मुंडे यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या माने जवळील मांसाचा तुकडा मारेकरी गोट्या गितेनं वाल्मिक कराड याला दाखवला आणि तो तुकडा आठ दिवस मारेकरी लोकांना दाखवत धाक दाखवत फिरत होते', अशी धक्कादायक माहिती बाळा बांगर यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सांगितली.
महादेव मुंडे प्रकरणी अजूनही न्याय मिळाला नाही. एकीकडे त्यांची पत्नी या प्रकरणी न्याय मागत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी कुणालाही चीड येईल अशी संतापजनक माहिती समोर आली आहे. बाळासाहेब बांगर यांच्याशी न्यूज१८ लोकमतच्या प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी त्यांनी धक्कादायक असा खुलासा केला आहे.
advertisement
"१००० टक्के खरं आहे, महादेव मुंडे यांचं शवविच्छेदन झालं त्यामध्ये त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यांच्या मानेजवळ असलेल्या मासाचा तुकडा हा मिसिंग होता. हे शवविच्छेदन अहवालातही स्पष्ट झालं आहे.  वाल्मिक कराडच्या सांगण्यावर गोट्या गितेनं हत्या केली होती. महादेव मुंडेंची हत्या केल्यानंतर एका पिशवीमध्ये महादेव मुंडे यांच्या मानेजवळील मासाचा तुकडा घेऊन फिरत होता. तो मासाचा तुकडा सात आठ दिवस घेऊ फिरत असल्यामुळे वाळला होता. लोकांमध्ये दशहत निर्माण करण्यासाठी ते तो करत होता' असा खुलासा बांगर यांनी केली.
advertisement
लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य होतं. पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन गोट्या गिते दहशत करत होता. पोलिसांना महादेव मुंडे यांच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी कोण होता हे माहित होतं. पण तरीही त्यांनी काही केलं नाही. प्रत्यक्षदर्शीची नंतर हत्या करण्यात आली. वाल्मिक कराडने नंतर पोस्टमार्टमचे रिपोर्ट बदलले. तत्कालीन पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीला चौकशीला बोलावलं होतं. पण वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीवर दबाव टाकला होता. तो प्रत्यक्षदर्शी दोन तीन महिनेत फिरत होता, वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा यामध्ये हात आहे असं सांगत होता. त्यानंतर त्याचा छळ केला, नंतर त्याला मारून टाकलं, त्याला इंजेक्शन देऊन आजारी पाडलं, असंही बांगर यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंच्या मानेचा तुकडा पिशवीत टाकून तो वाल्मिक कराडकडे गेला होता, मन सुन्न करणारा खुलासा
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement