Manoj Jarange: 'आता उपचार नाही घेतले तर...' डॉक्टरांनी जरांगेंबाबत व्यक्त केली भीती
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
अंतरवाली सराटीत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंची प्रकृती ढासळली आहे, तात्काळ उपचार घेण्याची गरज असल्याचं डॉक्टरांचं मत आहे.
अंतरवाली सराटी, जालना:
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजालवणी आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण या मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. अशात मनोज जरांगेंची प्रकृती ढासळली आहे, तात्काळ उपचार घेण्याची गरज असल्याचं डॉक्टरांचं मत आहे.
डॉक्टरांनी व्यक्त केली भीती:
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. जरांगेंची शुगर 62 तर बीपी 98 पर्यंत घसरला आहे. डॉक्टरांनी अलिकडेच केलेल्या तपासणीमधून ही बाब समोर आली आहे. जरांगेंची सर्व तपासणी करणाऱ्या डॉ. पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
आज उपोषणाचा चौथा दिवस संपतो आहे. मनोज जरांगे यांनी सध्या उपचार घेण्याची सक्त गरज असल्याचं डॉ पाटील म्हणाले आहेत. जरांगेंनी असं न केल्यास "ते बेशुद्ध होवू शकतात, असं डॉक्टर म्हणाले.
मागण्यांसाठी जरांगे झाले आक्रमक:
मनोज जरांगेंनी सगेसोयरेच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी सरकारला दिलेली मुदत 13 जुलै रोजीच संपली आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगे आक्रमक भूमिकेत आहेत. जरांगेंनी उपोषण सुरू केलं आहे. दुसरीकडे मागेल त्या मराठा बांधवाला आरक्षण आणि मराठ्यांना ओबीसीमधून टीकणारं आरक्षण या मागणीवर जरांगे ठाम आहेत. अन्यथा राज्यातील विधानसभा निवडणुकीत सरकारला कचका दाखवू, असं जरांगेंनी या आधीच स्पष्ट केलं आहे. 288 उमेदवार पाडण्याचा इशारा जरांगेंनी दिलेला आहे.
advertisement
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. मनोज जरांगेंनी सगेसोयरेच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव आणण्यास सुरूवात केली आहे. सतेच विधानसभा निवडणूकीत 288 उमेदवार पाडू, ठिकठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार देणार असं जरांगे म्हणाले होते. अशा परिस्थितीत आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आक्रमक झाले आहेत. त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सरकारला गंभीर इशारा दिला आहे. त्यामुळे सरकार कोंडीत सापडण्याची चिन्हं आहेत.
advertisement
प्रकाश शेंडगेचा राज्य सरकारला इशारा:
view commentsमराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीतून उपोषण सुरू केलं आहे. सरकारला त्यांनी मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजाणीसाठी मुदत दिली आहे. अन्यथा पुन्हा एकदा मुंबईत येत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अशात परिस्थितीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. " मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला बळी पडून वेगळा निर्णय सरकारने घेतल्यास आम्ही महायुतीचे सरकार पाडू, आम्ही सरकारचे आमदार पाडू…आणि आमची सत्ता स्थापन करू" असं प्रकाश शेंडगेंनी म्हटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 23, 2024 8:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange: 'आता उपचार नाही घेतले तर...' डॉक्टरांनी जरांगेंबाबत व्यक्त केली भीती


