Nanded Rain: संसार मोडला अन् साथही सुटली, मुसळधार पावसात वृद्ध दाम्पत्याचा झोपेतच मृत्यू, नांदेडमधील घटना

Last Updated:

मराठवाड्यात सर्वदूर पावसाने हाहाकार माजवला आहे. तर नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे.ठिकठिकाणी नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे.

News18
News18
नांदेड : राज्यभरात एकीकडे दहीहंडीचा उत्साह आहे तर दुसरीकडे राज्यभरात पावसाने धुमशान घातलं आहे. मराठवाड्यात सर्वदूर पावसाने हाहाकार माजवला आहे. तर नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे. ठिकठिकाणी नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. अशातच कंधार तालुक्यात भिंत कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्वदूर पाऊस सुरू आहे. अशातच कंधार तालुक्यातील कोटबाजार गावामध्ये अंगावर भिंत कोसळून पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. शेख नासेर आणि त्यांची पत्नी शेख हसीना यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.  मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शेख नासेर यांचं कोटबाजारात मातीचं घर आहे. संततधार पावसामुळे कच्च्या मातीची भिंती कमकुवत झाली. त्यातून ही घटना घडली. शुक्रवारी रात्री शेख नासेर त्यांच्या पत्नी शेख हसीना झोपलेले असताना अंगावर भिंत पडली. यात दोन्ही वृद्ध दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
advertisement
किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस, रिकामी स्कूल बस पुराच्या पाण्यात अडकली
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तालुक्यात नदी नाल्यांना पूर आला आहे. बोधडी ते सिंदगी रस्त्यावर शाळेची रिकामी बस पुराच्या पाण्यात अडकली. पाण्याचा जोर वाढल्यानं काही अंतरापर्यंत ही स्कूल बस वाहून गेली, नंतर एका ठिकाणी अडकली. बसमध्ये चालकाशिवाय कोणी नव्हतं. दरम्यान, बसचाचालक बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. कोठारी नदीला देखील पूर आला आहे. या पुराचे पाणी शेतात शिरले असून परिसरातील शेती जलमय झाली आहे.
advertisement
हिमायतनगर तालुक्यात सखल भागात साचले पाणी
तर जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे हिमायतनगर शहरांतील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आलं आहे. शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचलं आहे. अनेकांच्या घरात देखील पाणी शिरलं आहे. शिवाय तालुक्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे पिकांचं देखील नुकसान झालं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded Rain: संसार मोडला अन् साथही सुटली, मुसळधार पावसात वृद्ध दाम्पत्याचा झोपेतच मृत्यू, नांदेडमधील घटना
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement