Amazon वरून मागवलं रेफ्रिजरेटर, बॉक्स उघडताच ग्राहकाला बसला धक्का, नेमकं काय घडलं

Last Updated:

ग्राहकाने सेल पाहून रेफ्रिजरेटवर मागवला होता.पण ज्यावेळेस त्याच्या घरात ऑर्डर आली आणि त्याने बॉक्स उघडून पाहिला असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

hingoli crime
hingoli crime
Hingoli News : मनीष खरात, हिंगोली : दिवाळीला आता अवघ्या काही दिवसात सूरुवात होणार आहे. याआधी अनेक ऑनलाईन शॉपिंग साईटसनी सेलची घोषणा केली आहे.या सेलमध्ये अनेक वस्तुंवर भरघोस डिस्काऊंट दिला जातो. त्यामुळे अनेक ग्राहक या डिस्काऊंटला भूलत खरेदी करत असतात.अशाच एका ग्राहकाने सेल पाहून रेफ्रिजरेटवर मागवला होता.पण ज्यावेळेस त्याच्या घरात ऑर्डर आली आणि त्याने बॉक्स उघडून पाहिला असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे नेमकं त्याला बॉक्समध्ये काय आलं? नेमकी त्याची फसवणूक कशी झाली? हे जाणून घेऊयात.
हिंगोलीत एका ग्राहकाची ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. राजू कांबळे असे या युवकाचे नाव असून तो कळमनुरी शहरातील रहिवासी आहेत.राजू कांबळे यांनी त्याच्या एका ऑफिससाठी अॅमेझॉन या शॉपिग साईटवरून फ्रिजर वॉटर डिस्पेंसेर मागवला होता. पण हा डिस्पेंसेर घरात आल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला होता. कारण पार्सल बॉक्समध्ये डिस्पेंसेर नसून लाकूड,तुटलेले स्पिकर आले होते. त्यामुळे राजू कांबळे यांना हादरा बसला होता.
advertisement
राजू कांबळे यांनी ॲमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून वॉटर डिस्पेंसेर फ्रिजर ऑर्डर केला होता.परंतु पार्सल मिळाल्यानंतर मात्र बॉक्समध्ये चक्क कचरा, लाकूड टाकाऊ वस्तु निघाल्या आहेत.त्यामुळे या घटनेनंतर संतापलेल्या युवकाने सोशल मीडियावर या संबंधित व्हिडिओ व्हायरल करून घटनेची माहिती दिली. त्याचसोबत तशी अधिकृत तक्रार देखील या युवकांनी केली आहे आणि इतरांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील त्याने केले आहे.
advertisement
दरम्यान ऑनलाईन शॉपिंग करताना सावधान राहा नाहीतर तुमच्यासोबत देखील अशी फसवणूकीचा प्रकार घडू शकतो. जर अशी घटना घडल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा, अशी मागणी ही जोर धरते आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amazon वरून मागवलं रेफ्रिजरेटर, बॉक्स उघडताच ग्राहकाला बसला धक्का, नेमकं काय घडलं
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement