आधी स्कुटरला धडक नंतर विजेच्या खांबाला धडकला, थांब थांब म्हणताच...,छ.संभाजीनगरमधला हिट अँड रनचा थरारक VIDEO

Last Updated:

ही धडक इतकी भीषण होती की, स्कुटरचालक दूर फेकला गेला आणि स्कुटर रस्त्यावर काही अंतर फरफटत गेली. स्कुटरला धडक दिल्यानंतर ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला धडकली.

News18
News18
छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून हिट अँड रनची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात आलेल्या कारने एका स्कुटरला जोराची धडक मारली. धडक बसल्यानंतर दुचाकी काही अंतर फेकली गेली. दुचाकीला धडक दिल्यानंतर कार महावितरणच्या विजेच्या खांबाला धडकली. धडक दिल्यानंतर चालक कार घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेचा व्हिडीओचा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  छत्रपती संभाजीनगरमधील हडको एन 13 भागात ही घटना घडली आहे.  एका निळ्या रंगाच्या हुंदईची  कार ही भरधाव वेगाने आली, त्याचवेळी समोरून एक स्कुटरवर तरुण जात होता. त्याला जोराची धडक दिली.
advertisement
ही धडक इतकी भीषण होती की, स्कुटरचालक दूर फेकला गेला आणि स्कुटर रस्त्यावर काही अंतर फरफटत गेली. स्कुटरला धडक दिल्यानंतर ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला धडकली. कार धडकेमुळे विजेच्या खांब अक्षरश: वाकला होता. त्यामुळे या भागातील विज दोन तास बंद पडली होती.
स्कुटर चालक रस्त्यावर विव्हळत होता, पण स्थानिक लोकांनी धाव घेऊन स्कुटरचालकाला उचलून बाजुला केलं. लोक कारचालकाशी बोलत होते, पण त्याने मागे पुढे न पाहता घटनास्थळावरून पळ काढला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस कार आणि चालकाचा शोध घेत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी स्कुटरला धडक नंतर विजेच्या खांबाला धडकला, थांब थांब म्हणताच...,छ.संभाजीनगरमधला हिट अँड रनचा थरारक VIDEO
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement