हिंदू बहुल भागात २० पैकी १८ जागांवर भाजपचा पराभव, शिंदेंचा शिलेदार ठरला 'धुरंधर', असा फिरला गेम

Last Updated:

Malegaon Election 2025 : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून शहराच्या राजकारणात स्पष्ट सत्ता-समीकरण बदलल्याचे चित्र दिसत आहे.

election 2026
election 2026
मालेगाव : महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून शहराच्या राजकारणात स्पष्ट सत्ता-समीकरण बदलल्याचे चित्र दिसत आहे. इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्या आघाडीने स्थापन केलेल्या मालेगाव सेक्युलर फ्रंटने ४० जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापनेच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. बहुमतासाठी या आघाडीला आता केवळ तीन नगरसेवकांची गरज आहे. दुसरीकडे, शिवसेनेने विशेषतः पूर्व भागात जोरदार कामगिरी करत भाजपचा अक्षरशः सुपडा साफ केला आहे.
कुणाला किती जागा मिळाल्या?
८४ जागांच्या मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टी सर्वाधिक ३५ जागांसह पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. एमआयएमने २१ जागा मिळवल्या, तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळवला. समाजवादी पक्षाला ५, काँग्रेसला ३ आणि भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. हा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.
पूर्व भागात भाजपचा दारुण पराभव
शहराच्या पूर्व भागात शिवसेनेने १८ जागा जिंकत भाजपचा पूर्ण पराभव केला. भाजपला या भागात केवळ दोन जागा मिळाल्या. इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार आसिफ शेख आणि समाजवादी पक्षाचे नेते मुस्तकीन डिग्निटी यांनी आपले बालेकिल्ले कायम राखले. पश्चिम भागात मात्र शिक्षणमंत्री दादा भुसे आणि युवा नेते अविष्कार भुसे यांचा प्रभाव कायम राहिला. येथे शिवसेना-भाजपमध्ये थेट लढत झाली, मात्र निकाल शिवसेनेच्या बाजूने झुकले.
advertisement
भाजपच्या पराभवाची प्रमुख कारणे
भाजपच्या पक्षांतर्गत गटबाजी आणि स्थानिक पातळीवरील मतभेदांमुळे संघटनात्मक ताकद कमी झाली. तसेच वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष आणि स्थानिक प्रश्नांकडे पुरेसे लक्ष न दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. पारंपरिक व जुन्या चेहऱ्यांवर अवलंबून राहणे भाजपला महागात पडले.
पूर्व भागात बनावट जन्मदाखले, रोहिंग्या-बांगलादेशी आणि मुस्लिम असल्याचे आरोप, तसेच एसआयटी कारवाईमुळे मुस्लिम समाजात नाराजी निर्माण झाली. या कारवाईत अन्याय झाल्याची भावना मतदारांमध्ये होती. हीच भावना ओळखून आसिफ शेख आणि मुस्तकीन डिग्निटी यांनी मायनॉरिटी डिफेन्स कमिटी च्या माध्यमातून न्यायालयीन व प्रशासकीय लढा उभारला, ज्याचा थेट फायदा त्यांना झाला.
advertisement
शिवसेना कशी यशस्वी ठरली?
दुसरीकडे शिवसेनेने नवोदित आणि तरुण उमेदवारांना संधी दिली. आणि त्याचा मोठा फायदा झाला. मंत्री दादा भुसे यांचा मालेगाव हा बालेकिल्ला आहे. त्यांनी देखील आपल्या राजकीय दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हिंदू बहुल भागात २० पैकी १८ जागांवर भाजपचा पराभव, शिंदेंचा शिलेदार ठरला 'धुरंधर', असा फिरला गेम
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement