Board Exam: एक्झाम हॉलमध्ये वॉटर बॉटल नेता येणार की नाही, बोर्डाने दिला मोठा निर्णय
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Board Exam: लकवरच दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. या काळात विद्यार्थ्यांना पाणी पुरवठ्याबाबत बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पुणे: दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांना लवकरच सुरुवात होत आहे. यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता परीक्षा खोलीत विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल घेऊन जाता येणार आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यात जीबीएस या आजाराचा प्रसार झपाट्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून परीक्षा खोलीत पर्यवेक्षकाने ठरवून दिलेल्या जागेवर या पाण्याच्या बॉटल्स ठेवता येणार आहेत. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकऱ्यांनी माहिती दिलीये.
“आम्ही इतरवेळी परीक्षा खोलीत पाणी बॉटल घेऊन जाण्याची परवानगी देत नव्हतो. पिण्याच्या पाण्याची सोय संबंधित शाळेकडूनच केली जात होती आणि विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात तहान लागल्यावर ते पाणी पिऊ शकत होते. परंतु, सध्या जीबीएसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी कोणतीही रिस्क घ्यायला तयार नसतील. ते घरचं पाणी पिण्यासच प्राधान्य देतील. त्यामुळे ही सूट देण्यात आली आहे,” असे राज्य मंडळाचे चेअरमन शरद गोसावी यांनी सांगितलं.
advertisement
दरम्यान, परीक्षा काळात घडणारे गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना यापूर्वी वर्गात पाणी बॉटल घेऊन जाण्यास मनाई होती. आता जीबीएसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. येत्या 11 फेब्रुवारीपासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
February 07, 2025 8:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Board Exam: एक्झाम हॉलमध्ये वॉटर बॉटल नेता येणार की नाही, बोर्डाने दिला मोठा निर्णय


