IAS Transfer: ज्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला त्या प्रकल्पावरची बंदी हटवणाऱ्या IAS शेखर सिंह यांची बदली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
IAS Shekhar Singh : नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा विशेष आयुक्तपदी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली करण्यात आलीय. शेखर सिंह हे ऑगस्ट २०२२ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त म्हणून रुजू झाले होते. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे ते विशेष आयुक्त म्हणून पुढील पदभार स्वीकारतील. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार आता श्रवण हर्डीकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
नाशिकमध्ये होणारा आगामी कुंभमेळा लक्षात घेता राज्य सरकारने आधीपासून तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कुंभमेळा विशेष आयुक्तपदी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.
ज्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला त्या प्रकल्पावरची बंदी हटवणाऱ्या IAS शेखर सिंह यांची बदली
पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या अनेक प्रकल्पाची देशभर चर्चा झाली. विशेष म्हणजे मावळमधील शेतकऱ्यांनी ज्या प्रकल्पाला विरोध केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केला होता, त्या पवना बंद जलवाहिनीच्या प्रकल्पावरील बंदी हटविण्यात आली असून, प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती शेखर सिंग यांनी दिलीय. पवना बंद जलवाहिनीचा प्रकल्प शहरवासियांसाठी अत्यंत महत्वाचा असल्याचे ते म्हणाले.
advertisement
दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात सुमारे 900 एकर जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या कारवाईचे समर्थन करत कारवाई नंतर मोकळ्या झालेल्या भूखंडावर शहराच्या विकासाला गती देणारे अनेक प्रकल्प राबविले जातील असे सांगत आपल्या कारकीर्दीतील ही सर्वात महत्वाचे कामे असल्याचे त्यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना सांगितले.
राज्यमंत्रिमंडळ बैठकीदिवशीच सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
advertisement
१. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
३. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नियुक्ती नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिकच्या महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement
४. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती नाशिकच्या जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
५. जिल्हा परिषद ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
६. मुंबईच्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांची नियुक्ती पुण्याचे साखर आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
७. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदाल यांची बदली रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 08, 2025 10:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transfer: ज्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला त्या प्रकल्पावरची बंदी हटवणाऱ्या IAS शेखर सिंह यांची बदली