घरबसल्या व्यवसाय करायच्या विचारात आहात? दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू करा 'हा' बिझनेस, सर्व Detail बातमीत
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
गेल्या 30 वर्षांपासून जगदीश तन्ना यांनी सुरू केलेले रंग तरंग वूमन कॉर्नर मध्ये घरगुती सजावटी पासून ते स्त्री यांच्या अलंकारापर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू कल्याण मधील लक्ष्मी मार्केट मध्ये उपलब्ध आहे.
गेल्या 30 वर्षांपासून जगदीश तन्ना यांनी सुरू केलेले रंग तरंग वूमन कॉर्नर मध्ये घरगुती सजावटी पासून ते स्त्री यांच्या अलंकारापर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू कल्याण मधील लक्ष्मी मार्केट मध्ये उपलब्ध आहे. त्याचं हे दुकान फक्त फेस्टिव्हलमध्ये गजबजलेलं नसत तर कोणत्याही वेळी या दुकानात मेकिंग साहित्यासाठी गर्दी असते. तन्ना यांनी सुरू केलेलं हे कॉर्नर आज नथ, तोरण, पायपुसनी, शो पिस, बांगड्या, इयर रिंग, पोस्टर डिजाइन आदी घरगुती सजावटी तसेच स्त्रियांना घरगुती किंवा ऑनलाईन बिजनेस करायचा असेल तर कमी रेंज मध्ये इथे मटेरियल उपलब्ध आहे.
तन्ना यांना या बिजनेसचा लाखाच्या घरात फायदा होत असल्याने त्याचा रंग तरंग कॉर्नर हा कॉर्नर नसून अनेक स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभ करून देण्याचं माध्यम ठरले आहे. आज या कॉर्नरला 30 वर्ष झाली असली तरी या एवढ्या वर्षात तन्ना यांनी मार्केट भावापेक्षा कधीही ग्राहकांना जास्त दरात मार्केटिंग केली नाही आणि इथे येणारा ग्राहक हा कधीच रिकामा जात नाही. 5 रूपयांपासून 2000 रूपयांपर्यंत वस्तू उपलब्ध असल्याने घेणाऱ्यांची गर्दी इथे बघायला मिळते. दिवाळी सारख्या सणांना हाताने दिवे, पणती, तोरणे, रांगोळी बनविण्याचे साहित्य कमी रेंज मध्ये उपलब्ध आहे.
advertisement
तसेच लग्न सराई साठी ड्रेस, साडी, कुर्तीज, डेकोरेशन, स्टेज सजावट यासारखे अनेक प्रकारचे साहित्य होलसेल दरात उपलब्ध आल्याने ग्राहकांना फायदा होतो. सुरुवातीला तन्ना यांनी रेडिमेड वस्तू तोरण, फेस्टिव्हलनुसार वस्तू विकण्याचे छोटस रंग तरंग कॉर्नर सुरू केले आज त्याच कॉर्नर मध्ये अनेक प्रकारच्या वस्तु या कमी रेंज मध्ये मिळायला लागल्याने कोणत्याही सणाची तयारी करण्यासाठी बिझनेस करणाऱ्या महिला पुरुष यांच्या ऑर्डरी या कॉर्नर ला सुरू होतात.सामन्यापासून सगळ्यांच परवडणारे हे रंग तरंग. आज कल्याण मधल्या अनेक दुकानात फिरण्यापेक्षा इथेच सर्व उपलब्ध असलेले असे हे छोटस दिसणार कॉर्नर यात सजावटी ते स्त्रियांच्या अलंकाराचा खजाना रंग तरंग मध्ये नक्कीच बघायला मिळतो .
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
October 17, 2025 9:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घरबसल्या व्यवसाय करायच्या विचारात आहात? दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू करा 'हा' बिझनेस, सर्व Detail बातमीत