व्हिडीओ पुरावे दिलेत, लवकर निर्णय घ्या, निकालानंतरही हार मानणार नाही, इम्तियाज जलील यांचा पवित्रा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी भाजप नेते अतुल सावे यांचे पदाधिकारी पैसे वाटत असल्याचा आरोप इम्तिजाय जलील यांनी केला. याचा व्हिडीओ पुरावा घेऊन इम्तियाज जलील यांनी न्यायालयाचे दार ठोठावले.
छत्रपती संभाजीनगर : भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे. या लोकशाहीत सर्वात बोगस कोणती सिस्टम असेल तर एलेक्ट्रोल सिस्टम आहे. या व्यवस्थेतील सर्व लोक भाजप आणि मोदींसाठी काम करणारे आहेत. एवढे उघडपणे आम्ही व्हिडिओचे पुरावे देत आहे. एका वकिलाच्या ऑफिसमध्ये मुस्लिम लोकांना दीड हजार रुपये देऊन त्यांच्या बोटाला शाई लावली जात होती. दलित वस्तीत कशा प्रकारे पैशाचा वापर झाला हे आम्ही दाखवले. याची चौकशी कसली करता? तुमचे डोळे झाकले होते का? जिल्हाधिकारी कोणत्या आधारावर म्हणतात की असे झालेच नाही, असा संताप पराभूत उमेदवार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी भाजप नेते अतुल सावे यांचे पदाधिकारी पैसे वाटत असल्याचा आरोप इम्तिजाय जलील यांनी केला. याचा व्हिडीओ पुरावा घेऊन इम्तियाज जलील यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. मात्र संभाजीनगरच्या जिव्हाधिकाऱ्यांनी असे प्रकार घडलेच नाहीत, असे स्पष्ट केल्याने जलील यांनी संताप व्यक्त केला.
ज्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या खुर्चीवर बसवला आहे हे कुणाची भाषा बोलणार? ते सरकारच्या विरोधात बोलणार नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना चॅलेंज करतो. तुम्ही कोणत्या नजरेने पाहता आणि मी कोणत्या नजरेने पाहतो हे तुम्हाला सांगतो. आंबेडकरनगर मध्ये पैशांचे वाटप केले जात होते, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष का केलं? असा सवाल जलील यांनी विचारला.
advertisement
औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. त्यावरती तिघांची कमिटी तयार करण्यात आली होती. या तिघांनी रिपोर्ट तयार केले आहेत. त्यांचा रिपोर्ट आम्हाला मिळालेला नाही. तो रिपोर्ट बघून प्रशासनाने पुढची पाच तारीख दिली आहे. आम्हाला अवगत करायला हवे होते, असे जलील म्हणाले.
हा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे. नाहीतर नवे सरकार स्थापन होईल. इथून पुढचे पाच दिवस रोज सुनावणी घेतली तर तीन-चार दिवसात निकाल लागेल. मी लेखी देण्याची गरज नाही, मी दिलेले पुरावे हे पूर्णपणे व्हिडिओ स्वरुपात आहेत.पैशाचा वापर कसा वापर झाला, शाई लावून मतदान बाद करण्यासाठी काय काय केले, हे सगळे व्हिडीओत आहे. यामुळे प्रशासनाने कोणत्याही बाजूने निकाल द्यावा मात्र निकाल लवकर द्यावा, असेही जलील म्हणाले.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 28, 2024 9:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
व्हिडीओ पुरावे दिलेत, लवकर निर्णय घ्या, निकालानंतरही हार मानणार नाही, इम्तियाज जलील यांचा पवित्रा


