Income Tax Raid On NCP Leader : आयकर खात्याच्या धाडीनंतर नाईक-निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया,''राँग नंबर लागला अन्...''

Last Updated:

Income Tax Raid On NCP Leader : संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या पुणे आणि फलटण येथील निवासस्थानाची सुमारे 18 तास झाडाझडती सुरू होती. त्यानंतर आजही त्यांची चौकशी सुरू आहे. या सगळ्या घडामोडींवर नाईक-निंबाळकर कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

आयकर खात्याच्या धाडीनंतर नाईक-निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया,''राँग नंबर लागला अन्...''
आयकर खात्याच्या धाडीनंतर नाईक-निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया,''राँग नंबर लागला अन्...''
सातारा: विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे निंबाळकर यांच्या घरावर बुधवारी आयकर विभागाने छापा मारण्याची कारवाई केली आहे. संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या पुणे आणि फलटण येथील निवासस्थानाची सुमारे 18 तास झाडाझडती सुरू होती. त्यानंतर आजही त्यांची चौकशी सुरू आहे. या सगळ्या घडामोडींवर नाईक-निंबाळकर कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराव नाईक-निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले.
संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार असल्याचे वृत्त होते. त्यातच आयकर विभागाने त्यांच्यावर छापा मारल्याने चर्चांना उधाण आले होते. संजीवराजे निंबाळकर यांची आज देखील चौकशी सुरूच आहे. पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी संजीवराजे निंबाळकर यांच्या घरी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रघुनाथराव नाईक-निंबाळकरांनी काय सांगितले?

advertisement
रघुनाथराव नाईक-निंबाळकरांनी म्हटले की, लोकांनी आश्वस्त राहावं. या धाडीमधून काहीही निष्पन्न होणार नाही. अधिकाऱ्यांनी चौकशी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आणि प्रत्येक गोष्टीची माहिती या ठिकाणी दिली जात आहे. अशा पद्धतीने टार्गेट करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या धाडीमुळे किमान आता साप साप म्हणून भुई थोपटत होते ते तरी बंद होईल असेही त्यांनी सांगितले. आयकर विभागाचे सर्व अधिकारी तपास करत आहेत. या घरात कोणतीही चुकीची गोष्ट नाही, हे त्यांच्या लक्षात आलं असल्याचेही रघुनाथराजे यांनी सांगितले. संजीवराजे यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचे उत्तर असल्याचे त्यांनी सांगितले. फलटण म्हणजे बिहार नाही. त्यांना जे वाटत होतं तिथे पैशाचे ढिगच्या ढिग सापडतील. तशी परिस्थिती नाही प्रत्येक रुपयांचा हिशोब आहे. हा राँग नंबर असून इथं काही सापडणार नसल्याचेही रघुनाथराव नाईक-निंबाळकर यांनी म्हटले.
advertisement
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशिवाय रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरही आयकर विभागाने धाड टाकली. संजीवराजे आणि रघुनाथराजे हे दोघेही रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. रघुनाथराजे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Income Tax Raid On NCP Leader : आयकर खात्याच्या धाडीनंतर नाईक-निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया,''राँग नंबर लागला अन्...''
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement