BREAKING: अजित पवारांच्या उमेदवाराकडून टॉर्चर, हातावर नावं लिहून एकाने संपवलं जीवन, पुण्याला हादरवणारी घटना!

Last Updated:

पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच हडपसर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका व्यक्तीने उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं आहे.

News18
News18
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच हडपसर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक ४१ मधील सादिक उर्फ बाबू कपूर (वय ५६) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख शेख जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
सादिक उर्फ बाबू कपूर यांनी त्यांच्या कार्यालयात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या तपासात सादिक यांनी मरण्यापूर्वी आपल्या हाताच्या पंजावर काही नावे लिहिली होती, तसेच घटनास्थळावरून ३० पानांची सविस्तर सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूचे कारण आणि त्यासाठी कारणीभूत असलेल्या व्यक्तींचा सविस्तर उल्लेख केला आहे.
advertisement
फारुख शेख यांच्यावर गंभीर आरोप
प्राथमिक माहितीनुसार, हडपसरमधील सय्यद नगर येथील पाच गुंठे जमिनीवरून सादिक कपूर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख शेख यांच्यात जुना वाद सुरू होता. या वादातून फारुख शेख हे सादिक यांना मानसिक त्रास देत होता, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये असल्याचं समजतं. "फारुख शेख यांच्या त्रासाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे," असे सादिक यांनी नमूद केल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशात ऐन निवडणुकीच्या काळात उमेदवाराच्या छळाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
पुणे पोलिसांकडून तपास सुरू
लष्कर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सुसाईड नोटमधील नावांच्या आधारे तपास सुरू केला आहे. सुसाईड नोटमध्ये फारुख शेख यांच्यासह इतरही काही बड्या व्यक्तींची नावे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BREAKING: अजित पवारांच्या उमेदवाराकडून टॉर्चर, हातावर नावं लिहून एकाने संपवलं जीवन, पुण्याला हादरवणारी घटना!
Next Article
advertisement
Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election:  ठाकरे बंधूंचा आज 'मेगा शो'! २० वर्षांनी राज ठाकरे 'शिवसेना भवनात', 'या' १० मोठ्या घोषणानी बीएमसी निवडणुकीचा गेम बदलणार?
ठाकरे बंधूंचा आज 'मेगा शो'! २० वर्षांनी राज ठाकरे 'शिवसेना भवनात', 'या' १० मोठ्य
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज प्रचाराचा मेगा संडे

  • महापालिका निवडणुकीत युती जाहीर झाल्यानंतर आज ठाकरे बंधूंकडून वचननामा जाहीर करण्य

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जवळपास २० वर्षानंतर शिवसेना भवनात पाय ठेवणार आहेत.

View All
advertisement