Jalgaon Election: जळगावमध्ये हाय व्होल्टेज निवडणूक! धरणगाव–चाळीसगाव–पाचोरात कोणाचा गेम होणार?

Last Updated:

Jalgaon Election News : जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. धरणगाव, चाळीसगाव आणि पाचोरा या तीन नगरपालिकांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जळगावमध्ये हाय व्होल्टेज निवडणूक! धरणगाव–चाळीसगाव–पाचोरात कोणाचा गेम होणार?
जळगावमध्ये हाय व्होल्टेज निवडणूक! धरणगाव–चाळीसगाव–पाचोरात कोणाचा गेम होणार?
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. धरणगाव, चाळीसगाव आणि पाचोरा या तीन नगरपालिकांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या तिन्ही ठिकाणी स्थानिक नेत्यांमधील गटबाजी, युतीतील मतभेद आणि स्थानिक पातळीवरील प्रतिष्ठा आदी मुद्यांवरून ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे.

धरणगावमध्ये दोन गुलाबरावांची युती?

धरणगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर हे एकत्र येतील का, यावर संपूर्ण राजकीय समीकरण अवलंबून आहे. दोघांतील विधानसभेतील संघर्ष अद्याप थांबलेला नसला तरी धरणगाव येथील एका शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात पाटील यांनी देवकर आपल्या सोबत असतील असा संकेत दिले आहेत. मात्र ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ आणि माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी हे या समीकरणाला कडवे आव्हान देण्याची शक्यता आहे. जळगव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट यांच्यातच एकमेव प्रमुख लढत धरणगावात होणार होण्याची शक्यता असल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, अशी शक्यता आहे.
advertisement

चाळीसगावमध्ये चव्हाण विरुद्ध पाटील...

चाळीसगावमध्ये आमदार मंगेश चव्हाण आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा रंगणार आहे. दरम्यान, माजी आमदार दिवंगत राजीव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारातील सदस्याला महाविकास आघाडीने मैदानात उतरवल्यास ही निवडणूक सहानुभूती आणि प्रतिष्ठेची ठरण्याची शक्यता आहे. अर्थात तरी देखील हा सामना आमदार मंगेश चव्हाण आणि माजी खासदार उन्मेष पाटील असाच रंगेल, असेच सध्याचे चित्र आहे.
advertisement

शिंदे गट आणि भाजपात दोस्तीत कुस्ती...

पाचोर्‍यात मात्र महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वादच प्रमुख ठरणार आहे. आमदार किशोर पाटील यांनी भाजपावर गद्दारीचा आरोप करत पालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा साधारण महिनाभर आधीच करून टाकली आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांनीही स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये आमदार किशोर पाटील यांच्या परिवारातील सदस्य उमेदवारी दाखल करणार असल्याने या नगरपालिकेची निवडणूक ‘हाय व्होल्टेज’ ठरणार आहे.
advertisement

नगरपालिका की प्रतिष्ठेची निवडणूक...

जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वेळेस केवळ पक्षनिष्ठेच्या नव्हे, तर स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या लढती ठरणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हे किती ठिकाणी महायुती म्हणून कार्यकर्त्यांना नगरपालिका निवडणूक एकत्र लढविण्यास तयार करतात यावर देखील जिल्ह्यातील पालिका निकाल अवलंबून राहतील. यामुळे दोघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Election: जळगावमध्ये हाय व्होल्टेज निवडणूक! धरणगाव–चाळीसगाव–पाचोरात कोणाचा गेम होणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement