advertisement

धक्कादायक... चुकीच्या इंजेक्शनमुळे २ बालकांचा मृत्यू, जळगावचे डॉक्टर म्हणतात, आम्हीही शॉकमध्ये आहोत!

Last Updated:

Jalgaon Two children Death: जळगावात जावळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना इंजेक्शन दिल्यानंतर पुढच्या चार तासांत दोन बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चुकीच्या इंजेक्शनमुळे २ बालकांचा मृत्यू
चुकीच्या इंजेक्शनमुळे २ बालकांचा मृत्यू
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : शहरातील जावळे हॉस्पिटल येथे सेरेब्रल पारसी या आजारावर उपचारासाठी आलेल्या अडीच वर्ष आणि तीन वर्षीय बालकांना इंजेक्शन देण्यात आले होते. इंजेक्शन दिल्यानंतर साधारणतः चार तासानंतर दोन्ही बालकांना त्रास झाला. यात एका बालकाचा १८ एप्रिल रोजी तर दुसऱ्या तीन वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान २० एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे. पालकांनी याबाबत पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली असून डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे.
ज्या इंजेक्शनमुळे हा प्रकार घडला, संबंधित कंपनीला सूचना देऊन राज्यभरात ज्या त्यांनी इंजेक्शन वितरित झाले त्याचा वापर थांबवल्याबाबत तसेच तपासणीबाबत सूचना दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सेरेब्रल पाल्सी या आजाराच्या या दोन्ही बालकांवर उपचार करत असताना त्यांना butox नावाचे इंजेक्शन तसेच भुलीसंदर्भातील औषधे देण्यात आली होती. शुद्धीवर आल्यावर चार तासांनंतर दोघा बालकांची प्रकृती गंभीर झाली. एकाचा रुग्णवाहिकेत तर दुसऱ्या बालकाचा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला, अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, याबाबत आम्ही सुद्धा शॉकमध्ये असून पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर कारण कळू शकेल. याप्रकरणात आम्ही हलगर्जीपणा केला असल्यास निष्पन्न झाले तर जी कारवाई होईल त्या कारवाईला सामोरे जाणार. दोघे बालकांना दिलेल्या एकाच प्रकारचे butox नावाचे इंजेक्शन देण्यात आले होते आणि या इंजेक्शनच्या बॅचमधील सर्व इंजेक्शन राज्यातून परत मागविण्यात आली आहेत, अशी माहिती जावळे हॉस्पिटल संचालक डॉ.हर्षल जावळे यांनी दिली आहे.
advertisement
ज्या इंजेक्शनमुळे हा प्रकार घडला, त्या कंपनीला रिपोर्ट देत कळविण्यात आले आहे. तसेच राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी ते वितरित झाले आहे, त्याचा वापर थांबविण्यात येईल तसेच त्याची तपासणी होईल, असे सुद्धा डॉक्टरांनी सांगितले.
बालकांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. बालकाच्या पालकांनी केलेल्या आरोपानुसार योग्य तो तपास करून कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धक्कादायक... चुकीच्या इंजेक्शनमुळे २ बालकांचा मृत्यू, जळगावचे डॉक्टर म्हणतात, आम्हीही शॉकमध्ये आहोत!
Next Article
advertisement
Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले? 'सिक्रेट लिस्ट'ने वाढवलं टेन्शन
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement