कपडे वाळत घालताना विजेच्या तारेला स्पर्श, मुलीला वाचवायला वडील धावले, दोघेही जागीच गेले

Last Updated:

जळगावच्या मास्टर कॉलनीत विजेचा धक्का लागून बाप लेकीचा मृत्यू झाला तर भाची गंभीर जखमी झाली.

जळगाव बातम्या
जळगाव बातम्या
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : जळगाव शहरातील मास्टर कॉलनीत एकाच कुटुंबातील दोघांना विजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. शाबीर खान आणि आलिया खान अशी मयतांची नावे आहेत. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे दुर्घटना झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.

कपडे वाळत घालताना विजेच्या तारेला स्पर्श

मुस्लिम धर्मगुरू शाबीर खान यांची मुलगी आलिया ही घराच्या छतावर कपडे वाळत घालत असताना समोरील उच्च-दाबाच्या तारेला स्पर्श होऊन ती विजेच्या तारेला चिकटली. तिला वाचवण्यासाठी शाबीर खान आणि त्यांची भाची मारिया खान छतावर गेले असता दोघांनाही जोरदार विद्युत धक्का बसला.

रुग्णालयात कुटुंबीयांचा काळीज चिरणारा आक्रोश

advertisement
यात शाबीर खान आणि त्यांची मुलगी आलिया यांचा जागीच मृत्यू झाला, तर भाची मारिया खान ही गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. यावेळी रुग्णालयात कुटुंबीयांचा काळीज चिरणारा आक्रोश होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कपडे वाळत घालताना विजेच्या तारेला स्पर्श, मुलीला वाचवायला वडील धावले, दोघेही जागीच गेले
Next Article
advertisement
Gold News: अमेरिकेतून आली मोठी अपडेट, सोन्याच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक? नेमकं काय घडतंय?
अमेरिकेतून आली मोठी अपडेट, सोन्याच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक? नेमकं काय घडतं
  • अमेरिकेतून आली मोठी अपडेट, सोन्याच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक? नेमकं काय घडतं

  • अमेरिकेतून आली मोठी अपडेट, सोन्याच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक? नेमकं काय घडतं

  • अमेरिकेतून आली मोठी अपडेट, सोन्याच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक? नेमकं काय घडतं

View All
advertisement