Astrology 2026: नवीन वर्षात काहीच बदलणार नाही! आहे ते आहे तसं सुरू ठेवण्यातच या राशींचा फायदा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology 2026: आपल्या सर्वांना कदाचित माहीतच असेल ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा खूप शक्तिशाली ग्रह मानला जातो. प्रत्येकाच्या मनात शनिविषयी भीती असते. शनी आपली स्थिती बदलतो तेव्हा त्याचा प्रत्येक राशीवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. ज्योतिषांच्या मते, शनि जेव्हा राशी बदलते तेव्हा त्याच्या प्रभावामुळे काही राशींना साडेसाती आणि काहींना अडीचकी सुरू होते.
advertisement
advertisement
कुंभ - सध्या शनिदेव मीन राशीत विराजमान असून त्याचा थेट परिणाम कुंभ राशीच्या दुसऱ्या घरावर होत आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. तो संपताच तुम्हाला शनीची कृपा मिळू लागेल. पण, 2026 हे वर्ष थोडे आव्हानात्मक असेल. मानसिक तणाव वाढू शकतो. छोट्या कामांना जास्त वेळ लागू शकतो. ऑफिसमध्ये तुम्हाला राजकारणाचा सामना करावा लागू शकतो. अनेक लोकांचा आरोग्यावरील खर्चही वाढू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
धनू - 2026 मध्ये धनु राशीच्या चौथ्या चरणावर शनीच्या अडीचकीचा प्रभाव असेल. यामुळे जीवनातील चढ-उतार आणि तणाव वाढू शकतो. लहानसहान गोष्टीही कुटुंबात वादाचे कारण बनू शकतात. धनु राशीच्या लोकांनी इतरांच्या कामात अडकणे टाळावे, अन्यथा परिस्थिती जास्त बिकट होऊ शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


