Gold News: अमेरिकेतून आली मोठी अपडेट, सोन्याच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक? नेमकं काय घडतंय?

Last Updated:

Gold Price : मागील काही दिवसानंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरावर दबाव आल्याचे दिसून आले. अमेरिकेतील घडामोडीमुळे सोन्याच्या दराला ब्रेक लागणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेतून आली मोठी अपडेट, सोन्याच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक? नेमकं काय घडतंय?
अमेरिकेतून आली मोठी अपडेट, सोन्याच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक? नेमकं काय घडतंय?
Gold News: सोन्याच्या दरात मागील काही दिवसांपासून चांगलीच तेजी आल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजार, वायदे बाजारातही सोन्याची तेजी दिसून आली होती. मात्र, मागील काही दिवसानंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरावर दबाव आल्याचे दिसून आले. अमेरिकेतील घडामोडीमुळे सोन्याच्या दराला ब्रेक लागणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
या आठवड्यात सोन्याच्या किमतींवर दबाव आला. अनेक दिवसांच्या वाढीनंतर ते प्रति औंस ४,२०० डॉलरच्या खाली घसरले. बाजार आता सप्टेंबरच्या पीसीई (Personal Consumption Expenditure) डेटावर लक्ष केंद्रित करत आहे. हा डेटा फेडरल रिझर्व्हचे पुढील धोरण निश्चित करण्यासाठी मदतशीर ठरणार आहे. कमकुवत कामगार बाजार संकेत, एडीपीमध्ये नोकऱ्यांची कपात आणि नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली नोकर कपात यामुळे दर कपातीची शक्यता अधिकच वाढली आहे. दरम्यान, फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांना दूर करण्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. त्यामुळे बाजारात अनिश्चितेचे वातावरण आहे.
advertisement
सप्टेंबरचा पीसीई (Personal Consumption Expenditure) डेटा हा उशिराने जाहीर होत असला तरी तो महत्त्वाचा मानला जातो. हा डेटा फेड रिझर्व्हसाठी महागाईचा सर्वात विश्वासार्ह मापक मानला जातो. या डेटानुसार, दर कपातीचा मार्ग स्पष्ट होईल. बाजार त्याआधीच संकेत दाखवत आहे.
लेबर मार्केटमधील अलीकडील संकेत देखील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आहेत. एडीपी खाजगी वेतनांमध्ये ३२,००० नोकऱ्यांची घट नोंदली गेली. खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या कमी होणे हे कंपन्या आता खर्च वाचवण्याच्या स्थितीत असल्याचे संकेत आहेत.
advertisement
शिवाय, चॅलेंजरच्या एका रिपोर्टनुसार, नोव्हेंबरमध्ये ७१,००० नोकऱ्या कमी झाल्या होत्या. अमेरिकेत रोजगारात कपात होत असल्याचे संकेत दिसून आले आहे.
या वातावरणात, बाजार आता उघडपणे असा विश्वास करत आहे की पुढील आठवड्याच्या FOMC बैठकीत दर कपात जवळजवळ निश्चित आहे. फ्युचर्स मार्केट्सच्या मते, दर कपातीची शक्यता ८७% पर्यंत पोहोचली आहे. गेल्या आठवड्यापेक्षा आता यात लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदार आता असे गृहीत धरत आहेत की फेडरल रिझर्व्ह कमकुवत होत चाललेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी पावले उचलणार आहेत.
advertisement

अमेरिकेत आणखी एक घडामोड...

दरम्यान, अमेरिकेत अशी चर्चा आहे की व्हाईट हाऊसचे सल्लागार केविन हॅसेट यांची मे महिन्यात जेरोम पॉवेल यांच्याऐवजी फेडरल रिझर्व्हचे प्रमुख म्हणून नियुक्ती होऊ शकते. असे झाल्यास दर कपातीची शक्यता आणखी वाढणार असल्याचा सूर बाजारात उमटत आहे.
सोन्याला सामान्यतः दर कपातींमुळे पाठिंबा मिळत असला तरी, या आठवड्यात किमती घसरल्या. गुंतवणूकदार महत्त्वपूर्ण डेटा रिलीज होण्यापूर्वी नफा वसुली करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे डेटा रिलीज झाल्यानंतर निर्णय घेण्याकडे गुंतवणूकदारांचा कला दिसून येत आहे.
advertisement
एकंदरीत, या आठवड्यात सोन्याच्या दरात वायदे बाजारात घसरण झाल्याचे दिसून येते. मात्र, सोन्याच्या दराची पुढील दिशा ही फेडरल रिझर्व्हचे दर कपातीच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. डेटा प्रतिकूल असल्यास सोन्यात पुन्हा एकदा जोरदार तेजी येऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold News: अमेरिकेतून आली मोठी अपडेट, सोन्याच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक? नेमकं काय घडतंय?
Next Article
advertisement
Gold News: अमेरिकेतून आली मोठी अपडेट, सोन्याच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक? नेमकं काय घडतंय?
अमेरिकेतून आली मोठी अपडेट, सोन्याच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक? नेमकं काय घडतं
  • अमेरिकेतून आली मोठी अपडेट, सोन्याच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक? नेमकं काय घडतं

  • अमेरिकेतून आली मोठी अपडेट, सोन्याच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक? नेमकं काय घडतं

  • अमेरिकेतून आली मोठी अपडेट, सोन्याच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक? नेमकं काय घडतं

View All
advertisement