ऑनलाइन ॲपवर फ्लॅट शोधणं महिलेला महागात पडलं, २ लाख झटक्यात गेले, नेमकं काय घडलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
एका भामट्याने यावल तालुक्यातील चितोडा गावातील २९ वर्षीय महिलेला तब्बल २ लाख ३८ हजार ३९९ रुपयांचा आर्थिक गंडा घातला.
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी, जळगाव : जळगावच्या यावल ऑनलाइन ॲपवर घर (फ्लॅट) शोधणे चितोडा येथील महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या अज्ञात भामट्याने यावल तालुक्यातील चितोडा गावातील २९ वर्षीय महिलेला तब्बल २ लाख ३८ हजार ३९९ रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. या गंभीर फसवणुकी प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चितोडा गावात राहणाऱ्या कल्याणी नितीन महाजन (वय २९) या महिलेने ६ डिसेंबर रोजी दरम्यान 'नो ब्रोकर' नावाच्या ऑनलाइन अॅपवर फ्लॅट शोधण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान, 'रमाकांत कुमार' असे नाव सांगणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. या भामट्याने श्रीमती महाजन यांचा विश्वास संपादन केला.
फ्लॅटच्या नावाखाली वेळोवेळी फोन करून पैसे उकळले
advertisement
फ्लॅटचे बुकिंग आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला वेळोवेळी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. फ्लॅटचे टोकन अमाउंट, डिपॉझिट तसेच 'परत मिळणारी रक्कम' (रिफंडेबल) असल्याचे सांगत, आरोपीने श्रीमती महाजन यांच्या बँक खात्यातून एकूण २ लाख ३८ हजार ३१९ रुपये स्वतःच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले.
पैसे ट्रान्सफर केल्यानंतरही फ्लॅटचे बुकिंग झाले नाही, अचानक संपर्क तुटला, फसवणूक झाल्याचे लक्षात आले
advertisement
पैसे ट्रान्सफर केल्यानंतरही फ्लॅटचे बुकिंग न झाल्याने आणि संबंधित व्यक्तीशी संपर्क तुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे कल्याणी महाजन यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, यावल पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मसलोदिन शेख हे करीत आहेत.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
December 16, 2025 9:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ऑनलाइन ॲपवर फ्लॅट शोधणं महिलेला महागात पडलं, २ लाख झटक्यात गेले, नेमकं काय घडलं?










