advertisement

Jalgaon : राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीचा छापा, 46 तास चौकशीनंतर लाखोंचा ऐवज जप्त

Last Updated:

ईडीने तब्बल 46 तास आर एल समूहाच्या ज्वेलर्सची चौकशी केली. आर एल समुहाचे 90 लाख रुपये रोख व ज्वेलर्समधील सोने फ्रीज केले आहे.

News18
News18
जळगाव, 19 ऑगस्ट : जळगाव येथे राजमल लखीचंद अर्थात आर एल समूहावर ईडीने छापा टाकला होता. ईडीने तब्बल ४६ तास चौकशीनंतर लाखोंची रोख रक्कम आणि ज्वेलर्समधील सोने जप्त केले. या प्रकरणी ईडीने समुहाच्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे आणि इतर काही कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. जप्त करण्यात आलेला ऐवज हा जळगावमधील एसबीआयच्या मुख्य शाखेत जमा केला जाणार आहे.
ईडीने तब्बल 46 तास आर एल समूहाच्या ज्वेलर्सची चौकशी केली. आर एल समुहाचे 90 लाख रुपये रोख व ज्वेलर्समधील सोने फ्रीज केले आहे. शुक्रवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास ईडीच्या पथकाकडून आर्थिक व्यवहाराचे दस्तावेज व इतर महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेण्यात आले आहेत. आर एल ज्वेलर्सची रोख रक्कम, सोने व ताब्यात घेण्यात आलेली आर्थिक दस्तावेज जळगावमधील एसबीआय बँकेच्या मुख्य शाखेत ईडी कडून जमा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
advertisement
एसबीआयकडून कोट्यवधींचे कर्ज घेतल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने दोन दिवस राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला. छाप्यानंतर ज्वेलर्सचे संचालक, माजी खासदार ईश्वरलाल जैन आणि त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांना समन्स बजावण्यात आले आहेत.
राजमल लखीचंद ज्वेलर्सने एसबीआयकडून ५०० कोटींपेक्षा जास्त कर्ज घेतले होते. ४ टक्के व्याजाने घेतलेलं हे कर्ज वसूल करताना बँकेकडून नियमबाह्य व्याज वाढवून अतिरिक्त कर लावल्याचा आणि थकबाकी वाढवून दिल्याचा दावा ईश्वरलाल जैन यांनी केलाय.
view comments
मराठी बातम्या/जळगाव/
Jalgaon : राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीचा छापा, 46 तास चौकशीनंतर लाखोंचा ऐवज जप्त
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement