Bhusawal News : ही दोस्ती तुटायची नाय, गोळीबारात दोघे गेले आणि एकत्रच निघाली अंत्ययात्रा, अख्खं गाव रडलं, PHOTO
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Bhusawal News : भुसावळमध्ये बुधवारी रात्री माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
जळगाव, (इम्तियाज अहमद, प्रतिनिधी) : भुसावळ शहरात बुधवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेत माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सुनील राखुंडे त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान आज सायंकाळी संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांची एकाच वेळेस अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही अंत्ययात्रा काढून तापी नदीवरील वैकुंठ धाम येथे एकाच वेळेस दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण शहर सुन्न झालं असून आज उत्स्फुर्तपणे शहर बंद ठेवण्यात आलं होतं.
जिगरी मित्रांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घनटेपूर्वीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत सुनील राखुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष बारसे यांनी तेरे जैसा यार कहा हे गीत गाऊन आपल्या घट्ट मैत्रीचा प्रत्यय दिला होता. काल या दोघांचीही हत्या झाली होती. त्यानंतर समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल होत असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement

दुहेरी हत्याकांडा प्रकरणी 8 संशयतांविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी 8 संशयीतांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 8 संशयतांपैकी एकाच भुसावळ मधून तर दुसऱ्या संशयित हा गुजरातमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना धुळे जिल्ह्यातील साक्री येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजू सूर्यवंशी व विनोद चावरिया असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांची नावे असून या हत्याकांडात अजून किती लोकांचा सहभाग आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
कशी घडली घटना?
view commentsमिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे दोघेही कारमधून जात होते. यावेळी पाठलाग करत मारेकरी मागून आले आणि त्यांनी या दोघांवरही बंदुकीतून गोळीबार केला. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर 10 ते 15 राऊंड फायर केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि दोघांचे मृतदेह रात्रीच पोलीस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. जिल्हा रुग्णालयात रात्री तीन वाजेपर्यंत प्रचंड गर्दी होती.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
May 30, 2024 10:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Bhusawal News : ही दोस्ती तुटायची नाय, गोळीबारात दोघे गेले आणि एकत्रच निघाली अंत्ययात्रा, अख्खं गाव रडलं, PHOTO


