Gulabrao Patil : जुलाबराव म्हटलं तर चालेल का? कार्यकर्त्यांची मंत्री गुलाबराव पाटलांना शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
कार्यकर्त्याने गुलाबराव पाटील यांना जाब विचारताना तुम्हाला जुलाबराव म्हटलं तर चालेल का असं ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलंय.
नितीन नांदुरकर, जळगाव, 06 सप्टेंबर : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या वातावरण तापलं आहे. यावरूनच वाद घालताना कार्यकर्त्याने गुलाबराव पाटील यांना शिवीगाळ केली. यावेळी गुलाबराव यांनीही कार्यकर्त्याला अपशब्दात सुनावलं. कार्यकर्त्याने गुलाबराव पाटील यांना जाब विचारताना तुम्हाला जुलाबराव म्हटलं तर चालेल का असं ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलंय.
मराठा आरक्षणावर न बोलण्यामुळे गुलाबराव ऐवजी तुम्हाला जुलाबराव म्हणायचं का? असा प्रश्न कार्यकर्त्याने विचारला. यानंतर संतापलेल्या गुलाबराव पाटील यांनी मीसुद्धा खालच्या भाषेत बोलू शकतो असं म्हणत त्या कार्यकर्त्याला सुनावले. दरम्यान, संतापलेल्या कार्यकर्त्याने शिवीगाळ केली तर प्रत्युत्तरादाखल बोलताना गुलाबराव पाटलांनीही त्याला शिवीगाळ केली.
advertisement
गुलाबराव पाटील आणि कार्यकर्त्यांचा हा फोन कॉल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ऑडिओ क्लिपला गुलाबराव पाटील यांचा फोटोही लावण्यात आला असून तो व्हायरल केल्या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये दोघांचे फोटो दिसत आहेत. कार्यकर्त्याचे नाव रमेश पाटील असं असल्याचे समजते.
दरम्यान, या क्लिपमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये गुलाबराव पाटील यांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीसह ती ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कार्यकर्त्याने आता गुलाबराव पाटील यांचे समर्थक मला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचंही म्हटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 06, 2023 12:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Gulabrao Patil : जुलाबराव म्हटलं तर चालेल का? कार्यकर्त्यांची मंत्री गुलाबराव पाटलांना शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल









