गावातील पोरासोबत प्रेमसंबंध, बापाचं मुलीसोबत अमानुष कृत्य, रात्री शांत झोपू दिलं मग... जालन्यातील भयावह घटना!

Last Updated:

जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलीला अत्यंत क्रूरपणे संपवलं आहे.

News18
News18
रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना : जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलीला अत्यंत क्रूरपणे संपवलं आहे. आरोपीनं झोपलेल्या जागीच मुलीचा गळा घोटला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं आपल्या मुलीनं आत्महत्या केली, असा बनाव रचला होता. मात्र त्याचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. पोलिसांनी त्याचं बिंग फोडलं आहे. प्रेम प्रकरणातून आरोपीनं ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी हत्येसह विविध कलमांतर्गत वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हरि बाबूराव जोगदंड असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी बापाचं नाव आहे. तो जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी ५ सप्टेंबरला आरोपी हरि बाबूराव जोगदंड याने पोलिसांना फोन केला होता. आपल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण पंचनामा करत असताना ही आत्महत्या नसून घातपात असावा, असा पोलिसांना संशय आला.
advertisement
यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर वडिलांनीच केल्याचं समोर आलं. मुलीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. ही बाब आरोपी वडिलांना मान्य नव्हती. या प्रेमप्रकरणावरून समाजात आपली बदनामी झाल्याचा राग बापाच्या मनात होता. याच रागातून त्याने मुलीचा गळा दाबून खून केला. हा गुन्हा लपवण्यासाठी आरोपी बापाने मुलीच्या गळ्याला दोरी बांधून तिला लोखंडी अँगलला लटकवले, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी हरि बाबूराव जोगदंड याला अटक केली आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध करत बापाने मुलाचा झोपल्या जागीच खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे दावलवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गावातील पोरासोबत प्रेमसंबंध, बापाचं मुलीसोबत अमानुष कृत्य, रात्री शांत झोपू दिलं मग... जालन्यातील भयावह घटना!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement