गोरगरिबांची लालपरी झाली 76 वर्षांची, जालन्यात झालं खास सेलिब्रेशन Video

Last Updated:

सर्वांची लाडकी असणाऱ्या लालपरीचा 76 वा वर्धापन दिन राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येतोय. जालन्यात देखील हा वर्धापन दिन उत्सवात साजरा करण्यात आला. 

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : आपल्या शरीरात वाहणाऱ्या रक्तवाहिन्यांप्रमाणे राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचवून प्रवाशांचा प्रवास सुखकर करणारी लालपरी आता 76 वर्षांची झालीये. 1948 मध्ये पुणे-अहमदनगर या मार्गावर पहिली बस सेवा सुरू करण्यात आली. तेव्हापासून राज्यभरातील प्रवाशांच्या सेवेत अखंडपणे लाल परी काम करत आहे. बदलत्या तंत्रज्ञानासोबत देखील जुळवून घेत अनेक बदल एसटी बसणे स्वतःमध्ये केले आहेत. मग ते यूपीआयद्वारे पेमेंट स्वीकारणे असो किंवा तिकीटाच्या पद्धतीमध्ये केलेले बदल असो.  सर्वांची लाडकी असणाऱ्या लालपरीचा 76 वा वर्धापन दिन राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येतोय. जालन्यात देखील हा वर्धापन दिन उत्सवात साजरा करण्यात आला.
advertisement
बस स्थानकाची आकर्षक सजावट 
एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त बस स्थानकाला फुलांच्या हारांनी तसेच रंगीबेरंगी फुग्यांनी सजवण्यात आले. बस स्थानक परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आल्या. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुलाब पुष्प तसेच मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. बस सेवा म्हणजेच एसटी बस मागील 76 वर्षांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यातील जनतेच्या सेवेत कार्यरत आहे. राज्यातील पहिली बस पुणे-अहमदनगर मार्गावर 1 जून 1948 रोजी धावली. तेव्हापासून अविरतपणे लालपरीची सेवा सुरू असून यापुढे देखील प्रवाशांच्या सेवेत बस सेवा कायम असणार आहे, असं जालना बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक अजिंक्य जयवाल यांनी सांगितलं.
advertisement
मित्रांना भेट द्या शिवकालीन वस्तू, पिंपरी चिंचवडमध्ये सुरु झालंय खास दालन
प्रवाशांचा प्रवास सुखकर करणारी एसटी बसने काळाच्या ओघात होणारे बदल अतिशय सहजतेने स्वीकारून स्वतःला अत्याधुनिक सुख सुविधांनी युक्त केले आहे. यामध्ये यूपीआयद्वारे प्रवाशांकडून प्रवासी भाडे स्वीकारणे. प्रवाशांना छापील तिकिटाची व्यवस्था करणे. त्याचबरोबर ऑनलाईन रिझर्वेशन बुकिंग करणे आणि आता नवीन बदल म्हणजे इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेस प्रवाशांच्या सेवेत यासारखे नाविन्यपूर्ण बदल केले आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करणे शक्य होत आहे. अत्याधुनिक बदलांबरोबरच महिलांना तिकिटामध्ये 50 टक्के सवलत 75 वर्षावरील वृद्ध नागरिकांना मोफत बस प्रवास यासारख्या सुविधा देखील एसटी महामंडळ राज्यातील प्रवाशांना देते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
गोरगरिबांची लालपरी झाली 76 वर्षांची, जालन्यात झालं खास सेलिब्रेशन Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement